धग
धग
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
6
वेळी अवेळी पाऊस पडतो
टपटप सरींचा आवाज येतो
धरणी काही शांत होती
ओलाव्यात रांगोळी पुसली जाती
शितलतेचा एक निवारा
क्षणात होई बेसहरा
गपचुप चाल करून
जाई सगळं धुवून
मनास करी शांत
पडताना वाटे निवांत
वाफे आतून मातीचे
घेई सुख थेंबाचे
धग पेटून भिजली
भिजून वाऱ्यासह उडली