दिवाळी
दिवाळी
वधुसारखी वसुंधरा ही
नटली सजली आहे -
आज दिवाळी,रात उजळली,
सूर्य लाजला कारे
रांगोळीचे सप्तरंग तू
मनात उधळत जारे
घे वसा जीवनी माणुसकीचा,
असा थिजला कारे
चल दिप पेटवू अंतरीचा रे
उजळू जग हे सारे
अंधार मनीचा काढ माणसा,
असा विझला कारे
समानतेची ज्योत लावूनी,
जाळू जळमट सारे
नारीत बघ माणूस माणसा,
असा माजला कारे
घरदार सोडूनी जिंदगी
सीमेवर तेवत आहे
वंदन वीर जवाना तव
ग्रीष्म बहरला कारे