एका चिऊताईची व्यथा
एका चिऊताईची व्यथा
एका चिऊताईची व्यथा..
रखरखत्या त्या उन्हा त
छत्री घेऊन बाहेर मी पडले ..
चालता चालता अचानक अवचित घडलं
बघून ते दृश्य मला काहींचं नाही सुचलं ..
रस्त्याच्या मधोमध एक चिऊताई दिसली
जखमांच्या वेदनांमुळे होती ती विव्हळत बसली..
दुःखामुळे तिच्या ती झाली होती सुन्न
अवस्था तिची बघून माझे मन ही झाले खिन्न..
मुक्या त्या जीवाला सांगता येत नव्हती तिची व्यथा
पण बघून तिच्या अवस्थेकडे मला कळली तिची कथा..
कुठेतरी नकळत धडपडली होती ती हे मला कळले
वेळ न दवडता मग मी रुग्णालयाकडे वळले..
मुका जीव असला तरी तो एक जीवच आहे
वेदना तिच्या बघून माझा जीव थाऱ्यावर न राहे..
शेवटी तिच्यावर उपचार करून तिचा जीव वाचला
ऐकुण तिची खुशहाली माझा ही जीव आनंदी झाला..