गंध प्रेमाचा
गंध प्रेमाचा
लाजरा हा , साजरा हा गंध प्रेमाचा नवा
फुलूनी आला , खुलूनी आला , अंतरंगी मोगरा
मन वेडे माझे , बेधुंद झाले गं
मी चिंब चिंब प्रीतीत न्हालो गं
लाजरा हा , साजरा हा, गंध प्रेमाचा नवा
फुलूनी आला , खुलूनी आला , अंतरंगी मोगरा
मन वेडे माझे , बेधुंद झाले रे
मी चिंब चिंब प्रीतीत न्हाले रे
हरवले डोळ्यांत माझ्या , रूप तुझे देखणे
तुला पाहूनी , प्रिये मोहरले , सांजउन्हात चांदणे
माझी आबोली तू , माझी सावली तू
तू माझी सखीसाजणी ...
सूर हॄदयीचे , रिमझिम बरसले गं
मी चिंब चिंब प्रीतीत न्हालो गं
मन वेडे माझे , बेधुंद झाले गं
मी चिंब चिंब प्रीतीत न्हालो गं
हवेहवेसे वाटे मला , तुझ्यात जीव गुंतणे
तूच गाणे , तू तराणे , तुझ्यावाचून जग सुने ,सुने
माझा श्वास तू , माझा ध्यास तू
तू माझा सखासाजणा ...
रंग आभाळीचे , धरणीत मिसळले रे
मी चिंब चिंब , प्रीतीत न्हाले रे
मन वेडे माझे , बेधुंद झाले रे
मी चिंब चिंब प्रीतीत न्हाले रे