गणराज
गणराज
1 min
10
आतुरले मन माझे
ओढ लागली भेटीची
भटकलो तुज पाहण्या
तृप्तले मन ओढ भक्तिची ।।१।।
तुझी सेवा तुच
करुन घ्यावी देवा
नकळे बुद्धि हिन बाळक
मनात माझ्या तुझा हेवा ।।२।।
आज तुझा आनंदाचा
सोहळा रंगला छान
बसावे बाप्पा पाटावर
शोभुन गोड रुप पहिला मान ।।३।।