गुढीपाडवा
गुढीपाडवा
1 min
186
शिशिर सरता सरता
अलगद वसंत बहरला
चैत्राची चाहूल लागता
सुवास मोगऱ्याचा दरवळला!
चैत्र शुध्द प्रतिपदा
हिंदू नववर्षाचा सण
विजयाचे प्रतिक असलेल्या
उंच गुढीचा मान !
लांब बांबूच्या टोकाला
रेशमी वस्त्र छान
झेंडूची फुले, साखरेची माळ
कडुनिंबाच्या पानांना मान !
घरात होई स्वच्छता
दारावर झेंडूचे तोरण
रांगोळीने सजले आंगण
उत्साहीत चैतन्य वातावरण !
कडू आठवणी विसरून
करू नवीन गोड सुरुवात
नेहमीच नांदत राहो
सुख समृद्धी आयुष्यात !