गवताची पाती
गवताची पाती
भयावह आहे
रस्ता सगळा
वळून पाहे
नजारा आगळा
लांबून सडपातळ
काहीतरी विचित्र
टांगलेलं वटवाघळ
असे निमित्तमात्र
उभी असे
एक गाडी
जशी भासे
लपेटलेली साडी
घटनाक्रम कसला
मागोवा घेताच
किंचाळत हसला
एक सापळाच
सरकती जमीन
पुढं पुढं
कुणाच्या ताकदीनं
वाढणारं गूढ
थरथर कापून
हात उचलला
गवताच्या पातीनं
खरचटून गेला