हीच आहे मैत्री
हीच आहे मैत्री
1 min
307
जेव्हा एकमेकांसाठी कुणी
मरण्यास असेल तैयार
येवो कितिही वादळ म्हणेल
तू एकटा नाहीयेस यार
कधीच देणार नाही दगा
असते ही शंभर टक्के खात्री
देव ही नाव घेतो या नात्याच
ज्यास म्हणतात मैत्री
न दिसणाऱ्या दोरीने
बांधलेली असते गाठ
यश मिळवल्यास एकीने
आनंदाने दुसरी थोपटते पाठ
विश्वास असतो एकमेकींचा
अगदी जिवापाड
होणार नाही कमी
मग कोणी का येईना आड
जस कृष्ण आहे त्याच्यासाठी
सुदामाला होती खात्री
नेहमी ही काळजी
पाणी न यावे तिच्या नेत्री
माझ्या भाषेत खरंच
हिच आहे मैत्री
हिच आहे मैत्री