हरवलेलं बालपण...
हरवलेलं बालपण...
बालपणीचा काळ सुखाचा
कधी घेणार तुम्ही समजून ?
मिळेल का पुन्हा हे माझं ?
सांगा हरवलेलं बालपण .
मुले देवा घरची फुले
फुले सारी कोमेजली,
या स्पर्धेच्या युगामध्ये
होळी बालपणीची झाली.
मित्र, सवंगडी गेले दूर
मैदानावर न खेळती पोरं
दप्तर ओझे पाठीवर
मोबाईल ची ही पडली भर.
दूर गेला मामाचा गाव
अभ्यास, गृहपाठ वाढला फार,
सुट्टीत ही नसे खेळ,फिरणे
परीक्षा, अभ्यासाचाच घोर.
विटी- दांडू,गोट्या-चेंडू
खेळ सारेच गेले विसरून,
खंत वाटे माझ्या मनाला
देवा हरवले बालपण...