*जगाचा पोशिंदा - नको मला वेतन वा पेन्शन*
*जगाचा पोशिंदा - नको मला वेतन वा पेन्शन*
लाखों पगार घेऊनी ही
जूनी पेंशनसाठी नौकरी करणारे रस्त्यावर *पाहिली*
माझ्या शेतकरी राजाने मात्र घरात
दोन वाटणी केली भाकर *पाहिली* !१!
आमदार दोन मिनीटांत पेंशन घेऊन *गेला*,
आता या नौकरी वाल्यांचा पेंशन ओझा *पेला*,
ओझा पेलून पेलून माझा जगाचा पोशिंदा
मात्र झाडावर लटकून *मेला* !२!
नौकरी करणाऱ्यांची पोरं,
खाजगी शाळेत शिकतांना *पाहिली*,
माञ माझ्या शेतकऱ्याच्या घरातील पोरं
जिल्हा परिषद शाळेत *पाहिली* !३!
तुम्ही आहात पेन्शनच्या नादात *मस्त*,
माझ्या शेतकरीचे पोरं
गरिबीच्या रोगाने *ग्रस्त*!४!
तुम्ही जुनी पेन्शनची करता मागणी
लाखों पैश्याची भविष्यात कराल *जोडणी* ,
मात्र महावितरण करत राहील
शेतकऱ्यांची शेतीची विज *तोडणी*!५!
माझा शेतकरी बाप वावरात उभ्या ऊन्हात *झोपला*
शेतकरी बापावर मात्र पाऊस *कोपला*!६!
उभ्या ऊन्हात हा काढतो *घाम*,
मग द्या शेतकऱ्याला
ह्या नौकरी वाल्या सारखा *दाम* !६!
नका देऊ वेतन, नका देऊ पेन्शन *शेतकऱ्यांला*
फक्त कर्जमाफी द्या माझ्या जगाच्या ह्या *पोशिंद्याला*