Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shubhangi Belgaonkar

Others

3.8  

Shubhangi Belgaonkar

Others

“कौल कुणाला”

“कौल कुणाला”

1 min
251

लोकसभेचा रणसंग्राम असो की महापालिकेची वारी|

मतांची भिक्षा मागण्यासाठी ते फिरतात दारोदारी|

भूलथापांना यांच्या मी बळी नाही पडणार|

व्यक्तीच कामच महत्वाच ठरणार, नाही पक्षीय बलस्थान|

म्हणूनच सख्यांनो मी करणार मतदान, तुम्ही सुद्धा करा मतदान||

पाण्यासाठी वणवण फिरणारी “ती” कधी कोणाला कळणार?

गारपीटग्रस्त बळीराजा मदतीसाठी किती वाट बघणार?

अजूनही किती “निर्भया” अन्यायाला बळी पडणार?

“कौल मराठी मनाचा” आता सर्वांनाच दिसणार|

आपल्या एका निर्णयाने होईल सरकार गतिमान|

म्हणूनच सख्यांनो मी करणार मतदान, तुम्ही सुद्धा करा मतदान||

ना केशरी महत्वाचा ना निळा| ना लाल महत्वाचा ना हिरवा|

तुम्हा आम्हा सर्वाना हवा विकासाचा रंग बरवा|

असेच सरकार पाहिजे जे जपेल स्त्रियांचा आत्मसन्मान|

म्हणूनच सख्यांनो मी करणार मतदान, तुम्ही सुद्धा करा मतदान||

आघाडी आणि महाआघाडीची बेरीज वजाबाकी|

युती आणि महायुतीची तर एकी कि बेकी|

आपली आपल्याला कळलीच पाहिजे जबाबदारी|

कारण आपल्याच हातात आहे बदल घडवून आणण्याची ताकद खरी|

आपल्याच हक्कासाठी घराबाहेर पडायला नका घेऊ मानापमान|

म्हणूनच सख्यांनो मी करणार मतदान, तुम्ही सुद्धा करा मतदान||

Rate this content
Log in