कळीचे फूल होता...
कळीचे फूल होता...
कळीचे फूल होता,
दोन हात चार झाले,
उंबरठा ओलांडून पाऊल ,
तुझ्या संगतीने पडले ...
नवा रोमांच जीवनात,
नवे तरंग मनात उठले,
नव्या स्वप्नांची जादू,
नाविन्यांने जग भरले...
ओल्या मेंहदींचा सुहास,
तुझे इरादे बहकले ,
उन सांडता ओठावरती ,
कोवळ्या हळदीने रंगले ...
गुलाबीच नशा चढली,
रात्र ताऱ्यांची झिंगली ,
बाहू पसरून खिडकीत,
चंद्रास ती भेटली ...
क्षणभर थांब ना ,
मिठीत स्वप्ने गुंतली,
तुझ्या माझ्या प्रितीची ,
सुंदर पहाट उजाळली ...