लाट
लाट
तू मोगऱ्याची लाट, तुझा केवड्याचा थाट
तुझ्या चाफ्याच्या देहाला,असे केशराचा काठ.
तुझ्या अंगोपांगी झरे, त्यात लावण्य ग फिरे,
तुझ्या मदन कुंभात, दाटे तारुण्य ग सारे
तुझा मल्मली शृंगार, तूच रसाची बहार
तुझ्या गाभ्यात वाहते, मत्त सुरंगीची धार
तुझी घाटदार काया, अंगी अत्तराचा फाया
तुझ्या सुगंधाचे पान, मला हवे ग हुंगाया.