Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Surekha Chikhalkar

Children

3  

Surekha Chikhalkar

Children

लेक माझी भाग्याची

लेक माझी भाग्याची

1 min
128


होता आगमन परीचे माझ्या

घरकुल माझे निनादले

बाप झाल्याचे सुख तिच्या

रूपाने मन आनंदले....    1


लेक माझी भाग्याची

आहे ती माझ्यासाठी

जन्मा आली माझ्या घरी

आहेत ऋणानुबंधाच्या भेटी.... 2


गुंतले धागे,हळव्या रेशीमगाठी

प्रथम तुला पाहताना

शहारले मन ,थबकले पाय

आनंदाश्रू ओघळताना .... 3


टवकारले होते कान

पहिल्यांदा बाबा म्हणताना

दुडूदुडु धावत येऊन

मिठीत माझ्या बिलगताना...  4


शाळेमध्ये पहिले पाऊल

नाही म्हणून रडताना

हवा होतो मी तुला

तुझा हात सावरताना. ...5


बालपण फुलत होतं

संस्कारात माझ्या वाढताना

पहात होतो कळीचे

रूपांतर फुलात होताना....6


माझ्या काळजीचे सुर

गवसले तुला मला पाहताना

पहात होतो हरक्षणी

दुसरी माझी आई होताना.....7


हो सावित्री , हो दुर्गा शिकून

झाशी बनून लढताना

नको लाचारी,नको अन्याय

हर स्थितिशी भिडताना..... 8


दाटतील अश्रू माझे

कन्यादान तुझे करताना

पहायचय बाळ माझ

प्रत्येकाचं आधार होताना. ...9


बाबा म्हणून हाक मारण्यास

नको दुसरी ओटी

पुन्हा जन्म मिळो

सदा माझ्याच पोटी...10


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children