माह्या पापणी खाली
माह्या पापणी खाली
1 min
13.7K
माह्या पापणी खाली गुपचूप वसतं काहून।
जती-तती मले हमेशा तू दिसत काहून।।
मले चटक लावू नको, मी शेतकरी गरीब,
माह्या कडे पाहून-पाहून तू हसतं काहून।।धृ।।
नापीकी,दुष्काळाच्या घेऱ्यात नेहमीच,
माया घराचा पता तू पुसतं काहून।
कर्जाच्या वझ्याखाली दबलेला मीच,
हृदयात गरीबाच्या घूसतं काहून।।१।।
शेतात पीक बहरलं तसं तूह्य यौवन,
मी त्याच्या अवती-भवती घालू गस्त काहून।
ना ते माह्य,ना हे माह्य, मी असा असहाय,
आपुलकीनं जवळ माह्या बसतं काहून।।२।।