Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Wandhare

Abstract Romance

3  

Manisha Wandhare

Abstract Romance

माझे पहिले प्रेम...

माझे पहिले प्रेम...

1 min
186


सागराच्या काठी चालतांना,

उधाणलेले मन हृदयाशी जपतांना ,

लाट फेसाळून अलगद आली ,

स्तब्ध श्वासांची फसगत झाली ...

क्षितीजाच्या कवेत राहून सांज गेली,

माझ्या पहिल्या प्रेमाची आठवण झाली,

रोमरोमांत दरवळला सुहासीत ,

काल भेटला वळणावर गुलमोहर अवचीत...

आज घेतला हात हातात काय झाले ,

बहरून चाफा पुर नदीला आले,

बेफान नदीची उसळलेली कहाणी ,

पहिल्या प्रेमाची सारी दुनिया दिवानी ...

नाजूक वळणावरचा किस्सा ऐकुनी ,

राधा धावून येते यमुना तिरी बासरी ऐकुनी,

कृष्ण हरवून जातो डोळ्यात तिच्या ,

आजही चटका तिला लागता गहिवर त्याचा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract