Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chitralekha Londhe

Romance

3  

Chitralekha Londhe

Romance

मावळती (सुर्यप्रकाश)

मावळती (सुर्यप्रकाश)

1 min
135

क्षितिजात लूप्त होणारी

का मावळती आवडते

मंद मंद हवा ती

गालाला हळू स्पर्शते

नकळत मन मग

कशामुळे शहारते

असे का ग होते...

त्या कातरवेळी

केसांची बट ती

गालाचे चुंबन घेते

लडीवाळ पणाने मग‌ मी

उगीच मागेे लोोटतेे 

असे का ग होते...

त्या कातरवेळी

आरशात रूप न्याहाळता

उगीच लाज डोळ्यात दाटते

जवळ कुणी नाही तरी

गालावर लाली चढते

असे का ग होते...

त्या कातरवेळी

फुलपाखरासम मन

अलगद उडू लागते

कुठेतरी एकांतात

कशाा हरवून जाते

कुणाची ग अनामिक

ओढ मना लागते

असे का ग होते...

त्या कातरवेळी

Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance