माय
माय
मायी माय कामाले जाते
जाता जाता मले चाराने देते
मयी माय पराट्या काढते
मले सावलीत राय म्हनते ,
आपुन पाणी पिऊन घेते
मले भाकर करुन देते ,
मायी माय कामाले जाते
जाता जाता मले चाराने देते
पदर बाबूईले लटकते
दांड लुगड्याले भरते ,
आपुन ऊनत सोसन करते
मले कालेजात जाय म्हनते ,
मयी माय कामाले जाते
जाता जाता मले चाराने देते
गाठी लुगड्याले बांधते
पैसे डिरेसाले देते ,
तिच्या मनात विचार येते
माया जिवाची कदर करते ,
घरातुन बाहेर येते
आपुन सळासारोन करते ,
फाटक्या वाकईवर सपन पायते
मले आफीसर होय म्हनते ,
मयी माय कामाले जाते
जाता जाता मले चाराने देते