Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Wandhare

Abstract

3  

Manisha Wandhare

Abstract

मी कामगार...

मी कामगार...

1 min
3

रोजच्या रोटीचा ,

तळहातावर भार ,

मेहनतीचा हार,

मी कामगार ...

रस्ते इमारती ,

बांधल्या डौलदार ,

मेहनतीत नाही भ्रष्टाचार,

मी कामगार ...

मळकट कपडे,

रोजीचा रोजंदार,

नको माझी हेळसांड,

मी कामगार ...

फोडतो मी ,

दगडाला पाझर ,

विश्वासाचे बाहू माझे ,

मी कामगार ...

ताटव्यांच्या भिंती,

चुलीला नाही निखार,

भुकेल्या पोटी निजतो,

मी कामगार ...

बंद केली माझी,

शिक्षणाची दार,

का? अशी उपासमार ,

मी कामगार...

बळ अंगी ,

मी कौशल्यदार ,

स्वप्न त्रासवते,

मी कामगार ...

Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract