ममत्व
ममत्व
घर संस्कारी बनवी
करे काळजी सर्वांची,
आई ममतेची छाया
दोर गुंफते नात्यांची....१..
देई विश्वास मनाला
उभी सदैव पाठीशी,
चुकल्यास समजावे
साथ मित्रत्वाची जशी....२..
ठेवी जोडून सर्वांना
सुख शांती आनंदानें,
तीच एकली सोशिक
प्रेम देई नि:स्वार्थाने....३..
कष्टकरी हात राबे
जपे आपल्या इच्छांना,
मान देऊन पुजते
घरच्यांच्या भावनांना....४..
अशी माझी माय असे
साधी भोळी आवडते,
तिच्याशिवाय अस्तित्व
माझे मीच नाकारते....५..