मोगरा
मोगरा
1 min
238
फुलला ग्रीष्मात मोगरा
वाहतो प्रीतीचा का झरा
सुटला सुगंध लाजरा
उनाड तो वारा बावरा
घातला बांध का साजरा
बेभान सुगंध लपेना
धाडीला सुवास राना वना
दाटले मळभ थांबेना
सचैल मोगरा भिजला
भिजला थिजला लाजला