Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anuradha Khare

Others

3  

Anuradha Khare

Others

निसर्ग राजा कोकण

निसर्ग राजा कोकण

1 min
226


लोक म्हणतात भारताचे निसर्ग काश्मीरला

खरच का? एकदा तरी भेट द्या आमच्या कोकणाला

कौलारू घरे, घरापुढे छान खळा

माड़, नारळ पोफली शेतांचा मळा

धरती नटते नेसून शालू हिरवा,

सोबत असतो अथांग निळा गारवा

कड़े,कपारी, डोंगर,निसर्ग पावन भूमि

हिरवी शेतां,भात नाचणी नसे कशाची कमी

सह्याद्रीची कुशी आणि अरबी ची गाज

जगण्याची नवी उमेद देई नसे कोणास माज

आंबा, काजू, नारळ फणस कोकण चा मेवा

हीच खरी समृद्धि आणि आठवणी चा ठेवा

कोकण म्हणजे घराघरात बसतो गणपति

चाकरमान्या ची अकरा दिवस भजन आणि आरती

म्हणूनच सांगते कोकण म्हणजे स्वर्गाहुन सुंदर

मायेने ओतप्रोत माणसे, प्रेमळ आणि कणखर

प्रत्येकाने एकदा तरी ह्या निसर्गाला हांक द्या

किमान एकदा तरी मायभूमीला भेट द्या 


Rate this content
Log in