पाऊस पहिला
पाऊस पहिला
पाऊस पहिला -
काळे काळे मेघ दाटले
वाऱ्याचे तांडव सुटले
टपटपत थेंब आले
मृदगंधी तटतटले
-१-
आला पाऊस तो पहिला
जो तो आनंदित जाहला
मिटली तलखी जीवाची
गिरक्या घेती बालबाला
-२-
आर्त नांगरल्या शेतीचे
नवल चित्र भवतीचे
निसर्ग राजा हरखला
दृश्य आकर्षे नवतीचे
-३-
पाऊसधारा तोषविते
मधून बिजली लवते
ओठी ताना साथ सरीला
प्रभुभक्तीने आळविते
-४-