पैसा ( अभंग रचना )
पैसा ( अभंग रचना )
करी पैसा पैसा I मागे त्या धावता I
खड्डा तो दिसता | थांबेचना ॥ १ ॥
मनी समाधान | असे ते महान |
सत्य तेच जान I मानवा रे ॥ २ ॥
रात्रीचा दिवस | पैशासाठी केला |
आजार जडला | असाध्य तो ॥ ३ ॥
हाव ती पैशाची I संपता संपेना |
पुढचा दिसेना | विनाश तो ॥ ४ ॥
प्रवास पैशाचा | अविरत चाले |
भले भले गेले | काळा आड ॥ ५ ॥