पंधरा एप्रिल
पंधरा एप्रिल
दुसरा लॉकडाऊन सुरू...!
आजची सकाळ नवी
आजचा दिवस नवा
मनात म्हंटले पहावे
जाता जाता आजची काय हवा..?
कानावर अस्सल
शब्द पडले कोल्हापुरी
कालच्या गोंधळावर
उमटले वण फेटेकरी...
च्यायला xxx xx ची
मराय बाहीर पडलीती
नुसता डोक्याला ताप
बारा xxx ची xxxx ची....
कान तृप्त झाले
घरात बसून बसून शेळपटले होते
बर वाटलं कोपऱ्यावरच
नतद्रष्टाचं बारसं पार पडलं...
पडदा पडला अंक संपला
वावटळ उठली तशीच बसली
गाडी घराकडे पुन्हा वळली
म्हटले पुन्हा घरात बसण्याची
वेळ सुरू झाली....
संकल्प केला आणि म्हटले
आम्ही आमचा शब्द पाळणार
ही साखळी कायमची
आम्ही तरी नक्की तोडणार....
प्रवास पुन्हा सुरू झाला
अनंता पासून अतापर्यंत
अगदी ही साखळी
समूळ तुटण्यापर्यंत...
वाटते आता प्रत्येकजण
मनावर घेऊन घरी बसतील
देश सेवेचे व्रत
संकल्पानेच पूर्ण करतील..!