Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shobha Wagle

Horror Crime Thriller

3  

Shobha Wagle

Horror Crime Thriller

रहस्यमय वाडा

रहस्यमय वाडा

1 min
182


एक पडका वाडा गावातला

असे विरळ बंगले गावातले

लोक वस्तीही तिथली विरळ

अन् शांत वातावरण तिथले.

भूतांमुळे तिथे कुणी जाईना

रात्री मात्र कुणीतरी असे तिथे

चोरांनी केला होता तिथे अड्डा

भिती वाटत नसे त्यांना इथे.

कारस्थान चालायचे त्यांचे रात्रभर

गावकऱ्यांना त्याचा पत्ता लागत नसे

रात्री तर नाहीच पण दिवसा सुद्धा

कुणीही तिथे जायला धजत नसे.

गावात होती उडाणटप्पू चार मुले

रात्रीस खेळ चाले तयांना कळले

बिन भोबाट पत्ता लावायचा ठरले

एक दिवस तेथे जाऊन लपून बसले.

रात्री तिथे रहस्यमय घटना कळल्या

चोर लुटेरे नसून ते होते अतिरेकी

बॉम्ब-स्फोटके बनवणे चालले होते

देशाकरता काम होते त्यांचे घातकी.

मुले होती फार हुशार नि वस्ताद

रात्र जागून पाहिला सर्व कारभार

दुसऱ्या दिवशी गेले तालुक्याला

रात्री पोलिसांना दाखवला दरबार.

मुद्देमालासकट पकडले साऱ्यांना

शत्रू देशाचा घाट घातला पायदळी

देशाचे संरक्षण केले त्या शूर मुलांनी

लोकांनी केला सत्कार जळी स्थळी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror