रंग प्रेमाचे
रंग प्रेमाचे
जीवनी भरला असा,
रंग प्रेमाचा कसा ?
भावतो तो तसा ,
भाव नजरेत जसा
रंग न्यारा प्रेमाचा ,
वंद्य जगी तो आईचा
माता ममता मायेचा ,
प्रेम पान्हा अमोल तईचा
रंग तो खरा प्रेमाचा,
हरीवरचा तो मीरेचा .
नितांत खोल अंतरीचा ,
पडे विसर मग तो धरेचा
रंग तो प्रेमाचा विखारी ,
दिसे स्वार्थलोलूप नजरी
ओसंडे वासना बाजारी ,
मनाविरुद्ध तेथे जबरी
प्रेमरंग तो असावा भावणारा,
स्नेह दरवळ अंतरी पसरणारा
असावा बंधनी कच्च बांधणारा ,
विश्वासाने एकमेकात गुंफणारा