Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

दर्शन जोशी

Others

3  

दर्शन जोशी

Others

ऋतु श्रावण

ऋतु श्रावण

1 min
215

जणू साऱ्या निसर्गाचा

शोभे सुगंधी साबण

आला पाऊस घेऊन 

आला ऋतु तो श्रावण !

रान हिरवे हिरवे 

झाले पाचूचेच वन

जपू असे निगुतीने

निसर्गाचे सर्व धन !

धरतीच्या अंगठीला

शोभे हिऱ्याचे कोंदण

कुठे लपवावे आता

असे मिळाले आंदण !

लक्ष्मी प्रकटली येथे

शेती मातीच्या रुपाने

मुक्त कणसात आले

शुद्ध नितळसे सोने !

वेचू सोनियाचे दाणे

वेचू मोतियाचे कण 

सुख समाधान देवो

सुखी असावा श्रावण !

Rate this content
Log in