Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nayan Dharankar

Classics Others

4  

Nayan Dharankar

Classics Others

शिवबा राजं

शिवबा राजं

1 min
245


कधी दऱ्याखोऱ्यात, डोंगर घाटामध्ये

दिसता तुम्ही,

कधी रायगडावर, लाल महाल सदरेवर

बसता तुम्ही,

कधी दगड मातीत, कधी शेत वावरात

भासता तुम्ही,

कधी शिवाई देवीचा, रायरेश्वराचा अभिषेक

करता तुम्ही,

अहो, लागली समद्या रयतेला तुमच्या

भेटीची आस,

शिवबा राजं, सांगा अजून कुठं कुठं

शोधू तुम्हास //१//


स्वाभिमानाचं, सन्मानाचं जगणं तुम्ही,

दिलं आम्हास

शिवबा राजं, सांगा अजून कुठं कुठं

शोधू तुम्हास //ध्रु//


कधी नदीच्या पल्ल्याड, डोंगर पल्ल्याड

दिसता तुम्ही,

कधी प्रतापगडाच्या, पुरंदरच्या पायथ्याशी

लढता तुम्ही,

कधी सरदारांसवे, शिलेदारांसह मोहिमेवर

राहता तुम्ही,

कधी आई जगदंबेच्या, महादेवाच्या मंदिरात

भासता तुम्ही,

अहो, शिवनेरी अन् राजगडावर तुमचा खरं

होतो आभास

शिवबा राजं, सांगा अजून कुठं कुठं

शोधू तुम्हास //२//


स्वाभिमानाचं, सन्मानाचं जगणं तुम्ही,

दिलं आम्हास

शिवबा राजं, सांगा अजून कुठं कुठं

शोधू तुम्हास //ध्रु//


कधी गावाच्या वेशीवर, रान वनराईत

दिसता तुम्ही

कधी हसत प्रसन्न होऊन मावळ्यांसवे

फिरता तुम्ही

कधी आमच्या घरात, आमच्याबरोबर

असता तुम्ही

कधी नदीच्या तीरावर, समुद्रतटावर

असता तुम्ही

अहो, महाराष्ट्राच्या मातीत सर्वत्र तुमच्या

अस्तित्वाचा वास

शिवबा राजं, सांगा अजून कुठं कुठं

शोधू तुम्हास//३//


स्वाभिमानाचं, सन्मानाचं जगणं तुम्ही,

दिलं आम्हास

शिवबा राजं, सांगा अजून कुठं कुठं

शोधू तुम्हास //ध्रु//



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics