श्रावण सरी आल्या दारी
श्रावण सरी आल्या दारी
1 min
170
ऊन माळलं *पावसाने*
*पावसाने* थेंब थेंबात
श्रावणसरी आल्या *दारी*
*दारी* मोती चमकवत.
ऊन पाऊसही *खेळती*
*खेळती* खो खो चा सामना
इंद्रधनुष्य होतो *पंच*
*पंच* सप्तरंगी पहाना.
पाचू चमचमले *आता*
*आता* हिरव्या रानावर
दवबिंदुंची नक्षी *छान*
*छान* धरेच्या शालुवर.
पारीजातक *ओघळला*
*ओघळला* शुभ्र केशरी
घातल्या पायघड्या *त्याने*
*त्याने* अंगणी, घरोघरी.
श्रावणसरी *बरसती*
*बरसती* कवितेतुन
कवीच्या शब्दांना *उधाण*
*उधाण* रंगात रंगुन