श्रीराम
श्रीराम
1 min
5
दिन तो भाग्याचा
आज उदयास आला
चैत्र मासात जणू
वसंत हा बहरला
आनंदीत सारी प्रजा
वाजे सनई चौघडा
रांगोळ्यांनी सुशोभित
चैतन्याचा घडे सडा
सूर्यवंशी रघुवंशी
अयोध्या वासी राम
प्रजादक्ष आज्ञाधारक
चरणी वसे मुक्तीधाम
एकनिष्ठ, एकवचनी
मर्यादा पुरुषोत्तम
मारुती सेवक तयाचा
भक्त गणला सर्वोत्तम
धर्म संस्थापक
रघुपती राघव
करूणा सागर
अर्धमाचे विध्वंसक
दीन- वत्सल प्रेमाचे आगर
पावन असे अक्षरे दोन
प्रचिती तयाची कैसी थोर
अवतार प्रभूचा हा सातवा
नीलवर्ण श्रीराम मनोहर