तुझ्या आठवणी
तुझ्या आठवणी
तुझ्या आठवणी
खुप दिवस तू जाऊनच झाले
आठवणीत माझ्या रोजच आहे | 1 |
तुझ्या माझ्या प्रेमाची जाण
तेव्हा नाही झाली आजच आहे | 2 |
तुझ्या वाचुन पाऊस बिचारा
मनात माझ्या रडतच आहे | 3 |
तुझ्यावीण जगणे हे माझे अधूरे
जसा पाण्यावीण मासाच आहे | 4 |
तू माझे श्वासच जणू घेऊनी गेली
'सुनिल' कृत्रिम श्वासावरीच आहे | 5 |