तू आणि मी
तू आणि मी
मी तुझ्या गालावर
एक सुरेख हास्य
देऊ शकतो
तू फक्त तुझ्या
होटावरची लाली
पुसून टाक
माझ्या हसऱ्या ओठांकडे बघून
तू तुझ्या गालावरच्या खळीला हसायला सांग
आणि तुझ्या ह्रदयावर
माझ नाव लिहून टाक
हरवनार नाही मी
माझ्या पाकिटात ठेवलेला
तुझा फोटो
काय तुझ्या मनात
मला सांगून टाक
माला माहीत आहे
माझ्या प्रेमाला
तुझा होकार जरी नसला
तरी तू नकार देवू शकत नाही
मला चोरून चोरून बघीतल्या शिवाय
तू राहू शकत नाही