काव्यगंधा
काव्यगंधा
काव्यगंधानी दळवळले रे
माझ्या सुरेख पंक्ती
शब्द शब्द हा सुहासला रे
कस्तुरीचा परी
लिहिते मी तुजसाठी सख्या रे
मोती डोळ्यातून झरी
वारा आणते गंध तुझा रे
काव्यगंधा परी
गंधाळूनी गेला श्वास प्रिया रे
ये तू लवकर घरी
मनास लागे ध्यास तुझा रे
का तू उशीर करी
मी मांडिले तुझ्यसाठी सख्या रे
मनातल्या शिंपीतील मोती
एक एक मोती अनमोल जणू रे
मम देहातील अंतर ज्योती