वेषाधारी देव
वेषाधारी देव
देव तो आपला सेवा करताना पाहिला
वेषात वेगवेगळ्या तो वावरताना पाहिला॥
खाकी वर्दीत तो रस्त्यावर पाहिला
तत्परतेने कार्य करताना दिसला॥
डाॅक्टर वेषात दवाखान्यात पाहिला
सतत सेवा देताना दिसला॥
रात्र-दिस शेतीत राबताना पाहिला
कामात तो त्याच्या व्यस्त दिसला॥
कामगारी वेषात काम करताना पाहिला
न थकता ओझे वाहताना दिसला॥