Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Comedy

2  

Neha Ranalkar

Comedy

विषय: कांदे पोहे

विषय: कांदे पोहे

1 min
1.3K


एक काळ असा होता की

कांदे पोहे म्हटलं की माझ्या

पानी सुटायचं हो तोंडाला |

आता कांदे पोहे नाव ऐकूनच

बसल्या जागेवरच मला की हो

घाम लागतो बरं फुटायला | |१| |


गेलो होतो पहिल्यांदाच मी

माझ्यासाठी मुलगी पहायला |

सोबतीला जिवलग मित्र ही

नेला होता मी तिला पहायला | |२ | |


लाजत मुरडत खाल मानेनं

थरथरत तिनं पोहे पुढे केले|

डोळं भरून पाहण्याच्या नादात

नकळत पोहे हातातून सुटले | |३ | |


मग काय विचारता पुढे राव

मला सारं ते सावरायलाच

त्या मुलीला हो म्हणावं लागलं |

आयुष्य भरासाठी उलटपक्षी

पदरी पडलं न पवित्र झालं हे

मला मात्र ऐकावंच लागलं | |४| |


आतातर कांदा झालाय महाग

भाव ऐकून आणतो डोळा पाणी |

कढईतल्या कांदे पोह्यां विषयी

आयुष्याभर ऐकून घ्यावी गाणी | |५| |


आतातर पोहे खाऊन उलटं

पित्त लागलंय माझं खवळू |

कांदे पोह्यांऐवजी गाड्यावर

कांदाभजीच लागलो बरं तळू | |६| |


आताशा तर मी कुणाबरोबरही

मुलगी पहाण्यासाठी नाही जात |

जावं लागलंच तरी विनाकारण

मुलींकडे फिरकूनही नाही पहात | |७| |



Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy