व्यक्त झालो मीही जेव्हा कवितेमधूनी
व्यक्त झालो मीही जेव्हा कवितेमधूनी
1 min
36
खोटे वागणे मला कधी जमले नाही मी कसा हे दुनियेस कधी कळले नाही
करून पाहिली सुख दुःखांची गोळा बेरीजतरी आयुष्याचे गणित कधी जुळले नाही
सावलीसम ती असते सोबत म्हणुनी आठवणींनी तिच्या कधी छळले नाही
तू कश्यास चिंता करतो इतकी मित्रा मैत्रीमधे रुसवे फुगवे कधी टळले नाही
व्यक्त झालो मीही जेव्हा कवितेमधूनी घाव मनाचे पुन्हा कधी भळभळले नाही