Krishna Shuchi

Horror Tragedy

2  

Krishna Shuchi

Horror Tragedy

अ. ल. भयकथा: १३. झोपमोड

अ. ल. भयकथा: १३. झोपमोड

1 min
10


टिक टिक करणाऱ्या घड्याळाने रात्री बाराचे ठोके दिले.. विभाच्या शेजारी झोपलेला दिवाकर सावकाश उठला. तिची झोपमोड होईल म्हणून दबक्या पावलांनीच किचनकडे जाऊ लागला. काही वेळाने किचनमधली खुडबूड ऐकून विभाची सावध झोप मोडली.. उठून बसत तिने मोठ्याने आवाज दिला,

"दिवाकर, तू आहेस का किचनमध्ये?"

"हो, मीच आहे, झोप तू..", दिवाकरने प्रतिसाद दिला. त्याचा आवाज ऐकून विभा पुन्हा बेडवर अंग टाकणार.. पण पुढच्या क्षणी खाडकन तिची झोप उडाली! थरथरत्या नजरेने तिनं भिंतीवरच्या हार घातलेल्या दिवाकरच्या फोटोकडे पाहिलं. त्याच्या चेहेऱ्यावर पसरलेलं मंद हास्य निळसर चंद्रप्रकाशात चमकत होतं..


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror