Arun Gode

Tragedy

3  

Arun Gode

Tragedy

आंतर धर्मीय विवाह .

आंतर धर्मीय विवाह .

3 mins
188


         एका साधारण मध्यम वर्गीय कुंटुंबात एक मुलगा आणी त्याचे आई-वडील राहत होते. मुलगा एकटाच असल्यामुळे आई –वडीलांचा लाड़का होता. डोक्याने अभ्यासात फार हुषार नव्हता. शाळेत नियमित जात होता. त्याने बारावीं बोर्ड़ाची परीक्षा उत्तीर्ण केली होती . नंतर बी . सी .ए. करण्यासाठी कॉलेजला दाखला घेतला होता. वडी एका ट्राव्हल कंपानी मध्ये चालक होते.त्याच्या जवळ काही टॅक्सी होत्या. त्या त्याने भाड्याने दिल्या होत्या. तो त्याचा अतिरिक्त आयचा स्त्रोत होता. घरी तो मुलगा लहान पणा पासून चार चाकी वाहने पाहत असल्यामुळे त्याला त्याचे विशेष आकर्षण होते. त्यामुळे वाहने चालवण्याची सवय त्याला जड़ली होती. पूर्ण तरुण होण्यापूर्वीच, तो एक कुशल चालक बनाला होता. कॉलेज मधे त्याची ओळख टॅक्सी चालक म्हणून झाली होती. त्याचे उच्च शिक्षणात विशेष लक्ष्य नव्हते. तो कॉलेज मधे एकाच वर्गात एक –दोन वर्ष राहत शिकत होता . कसातरी नंतर पुढच्या वर्गात काठा –काठाने समोर सरकत होता. कॉलेजमधे जाण्याच्या उदेश फक्त त्याचा व्यवसाय होता. कुणालाही भाड्याने टॅक्सी लागली किंवा कॉलेजच्या मित्रांची सहल असली की तो स्वयं चालक म्हणून जात होता. त्याची ओळख टॅक्सीवाला म्हणून संपूर्ण कॉलेज मधे झाली होती. त्यामुळे त्याचे अनेक मित्र-मैत्रीणी होत्या. तो बघायला उंच पूरा , कसलेल्या पिळ दार शरीर काठीचा ,रुबाबदार व खटयाळ व्यक्तिमत्व दिसत होता. त्याचे हे व्यक्तिमत्व सहज कोणत्याही आकर्षित करण्यास पुरेसे होते. त्याच्या प्रेमात एक सुंदर तरुणी पडली होती. तरुणी इतकी मोहक,सुंदर व रूपवाण होती की तो तिला डावलु शकला नव्हता . दोघात प्रथम नजरेचे प्रेम झाले होते. दिवसेंदिवस त्यांचे प्रेम संबंध घट्ट होत गेले होते.

    मुलीच्या कुंटुंबात ती एकटीच संतती होती. तीच्या आई-वडीलांचा घरेलू व कार्यालयांचा फर्नीचरचा कारख़ाना होता. त्यांचे, त्याच्या समाजातील एका परिवाराशी घरघुती गाढ संबंध होते. त्या परिवाराची फर्नीचरच्या कारखाण्यात लागणा-या उपकरणाची फैक्टरी होती. त्यालाही एकाच मुलगा होता. त्या दोन्ही परिवारात रोटी-बेटीचा संबंधा विषयी संधी अगोदरच झाली होती. ते मुलीचे स्नातक पर्यंतचे शिक्षण पूर्ण होण्याची वाट बघत होते. जशी ती स्नातक झाली होती.लगेच तीच्या लग्नाची धाव-पळ ,सुरू झाली होती. मुलीला त्याची भनक लागताच ,तीचे कान उभे झाले होते. लोखंड गरम असतांनाच, त्यावर वार केला पाहिजे असे मुलीला वाटले होते. त्यामूळे तीने आपल्या प्रेमाचे रहस्य सर्वाण समोर आणले होते. आणी तीने स्पष्ट सांगितले की जो मुलगा , त्याना पसंद होता . तो तीला लहान पणा पासूनच . रूपाने व स्वभाने कधीच आवडला नव्हता असे तीने स्पष्ट बजावले होते. आणी ती त्याच्याशी लग्न करण्या पेक्षा, कुवारी राहने जास्त पसंद करेल !. आता कुंटुंब संकटात सापडले होते. त्यांची समाजात संबंध तोड़ल्याने थू –थू होणार होती. त्यांच्या नाकाच्या शेंडा कापल्या जाणार होता. परिवाराने आपल्या मुलीला समाजवाण्याच्या बराच प्रयत्न सर्व प्रकारे केला होता. पण बर्फ वितळत नव्हता. शेवटी मुलीने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे परिवाराने तीच्या हट्टा समोर आपले गुड़घे टेकले होते.

       परिवाराला पूर्ण विश्वास होता की हे त्यांचे प्रेम प्रकरण जास्त काळ चालणार नाही. त्यामुळे त्यांनी वर-वर मुलीला खुश करण्यासाठी परवांगी दिली होती. जेव्हा मुलीचा पक्ष लग्न करण्यासाठी तयार झाला होता. तेव्हा वर पक्षाला स्पष्ट सांगण्यात आले होते की ते फक्त मुलगीच देणार!. कोणत्याही प्रकारची आर्थीक मदत भविष्यात केली जाणार नाही असे स्पष्ट सांगण्यात आले होते. मुलगा दुसा-या धर्माच्या होता. पन त्या परिवाराची नियत एकदम साफ होती. त्यांनी लगेच वधू पक्षाची अट मान्य केली होती. शेवटी दोन्ही धर्मांच्या रुढी प्रमाणे आंतरधर्मीय विवाह सिमित व-याड़यांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता. त्या दोघांचा संसार एकदम सुसाट चालु होता. जारी दोन्ही  परिवारांचे संबंध जारी जुड़ले होते , त्यांची मन फाकले होती . त्यामुळे दोन्ही घराण्यात विशेष प्रेमाचे दाट संबंध बनले नव्हते, कारण जीते दोष मोठा असते, तीथे बहुतेक प्रेम नगण्यच असते. 

       सर्व काही ठिक-ठाक असतांना काळ चक्र उलटे फिरू लागले होते. मुलीच्या सास-याला जो-याच्या हृदय विकाराचा झटका आला होता. त्यामुळे रोग्याचा उपचार करतांना परिवाराची आर्थीक परिस्थिति ढासळली होती. मुलीला दोन जुळे मुले झाली होती. सासरची मंडळी एकदम खुश होती. नातवंडंच्या आगमना मुळे बिमार आजोबा ठिक होवु लागले होते. तीचा पति जिम्मेदारीने आपला व्यवसाय करीत होता. अचानक तीच्या सासा-याची पुन्हा त्याच आजाराने प्रकृती बिघडली होती. पण यावेळेस सास-याचा मृत्यु झाला होता. इलाज करतांना तीच्या पती वर भयंकर कर्ज आणी आपल्या टॅकस्या कवडीच्या मोलात विकाव्या लागल्या होत्या. त्यामुळे कुटुंब अष्टकोणी संकाटात सापडle होते. मुलीच्या डोक्यावर आभाळा इतके संकट कोसळले, पण माहेरच्या लोकांनी एका कवाडी मदत केली नव्हती . स्वाभिमानी वैवाहित जोड़पयाने पण त्यांच्या समोर हात पसरविले नव्हते. शेवटी या संकटातुन बाहेर पड़ण्यासाठी मुलीने एका निजी कंपानी मधे नौकरी करने सुरू केले होते. जवाई वाहक चालकचा व्यवसाय करीत होता. आणी आजी घर व नातांची सेवा करीत होती . विनने सुरू केले म्हणजे देव धागा देने सुरू करतो !. त्यामुळे संसाराची फिसकटलेली गाड़ी रुळावर वेग पकड़ू लागली होती. तरी माहेरच्या लोकांनचा, जो भ्रम होता. की त्यांच्या मुलीला ,त्या मुलाने फक्त संपत्ती मुलीवर गळफास फेकला होता. तो भ्रम ,ते दोघेही दूर करू शकले नव्हती. त्यांच्या पवित्र प्रेमाची तो पर्यंत कसोटी चालु होती॰


Rate this content
Log in