Neha Khedkar

Fantasy

4  

Neha Khedkar

Fantasy

आठवणीतला पहिला पाऊस

आठवणीतला पहिला पाऊस

3 mins
394


कोणाला सकाळचं कोवळं उन्ह आवडतं, कोणाला रात्रीच्या चंद्र प्रकाशात तारे बघायला आवडतं, तर कुणाला संध्याकाळच्या गार हवेत फिरायची हौसेने आवड असते.. मला मात्र पहिल्याच पावसात भिजत-भिजत भटकायची हौस आहे. कारण पहिला पाऊस येतो तेव्हा सुटलेला मातीचा सुगंध हा कोणत्याही महागड्या अत्तराच्या मोलाचा नाही, असं मला वाटतं...


जसं एखादं लहान मुलं आपल्याला गिफ्ट कधी मिळेल ह्याची आतुरतेने वाट बघत असतं, अगदी तसेच मी या पावसाची वाट बघत असते...नवीन संसाराच्या सुरवातीला येणारा पहिल्या पावसाचा अनुभव काही खासच होता..


बंगलोर आणि पावसाचे नाते अगदी घनिष्ठ... जरा कुठे सूर्यदेव जास्ती तापट झाले की पावसाने हजेरी लावून त्याला शांत केलेच समजायचे...असं सारखं मी नवऱ्या कडून ऐकले होते. पण अनुभव अजून आलेला नव्हता...त्यादिवशी सकाळीच आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली होती. मी उठून आवरुन गरम अद्रकाचा चहा करून बाल्कनीत उभी होती. रविवार असल्याने नवरा घरीच सुट्टीचा आनंद घेत झोपला होता...


चहाचा कप घेऊन मी पहिल्या पावसाच्या मातीचा सुगंध अनुभव करीत होती..दूरवर कुठे तरी पावसाने हजेरी लावली असावी...एकदम विजांचा कडकडाट झाला आणि त्या मेघगर्जनेने मी जरा घाबरले. तितक्यात नवरोबा मागून आले आणि मला गुपचूप मिठी मारली..." गुड मॉर्निंग..!" म्हणतं तो कानाजवळ कुजबूजला..


अचानक त्याचा येण्याने दचकून मी स्वतःला सावरले आणि 

 " गुड मॉर्निंग " म्हटले...


पावसाकडे एकटक बघते मी त्याला विचारले " तुला पाऊस आवडतो का ..?"


स्वारी लाडात येऊन म्हणाली, " पावसाचं काय ,तो कुठे नवीन नाही, पण तू मात्र मनापासून आवडतेस..."


मी लाजत फक्त रिमझिम पावसाची वाट बघत एकटक नजरेने न्हाहळत होती...



माझं असं एकटक पावसाच्या प्रतीक्षेत बघणं बघून तो नाराजीचा स्वरात म्हणाला, " इतका पाऊस आवडतो ,की फक्त त्याचाच कडे तुझे लक्ष वेधले आणि आमच्याकडे पार दुर्लक्ष...!"


मी हसतच त्याचा हात हातात घेऊन म्हटले, " अरे खरचं खूप आवडतो मला हा पाऊस...! बघ ना किती रम्य झालंय बाहेरचे वातावरण. पहिल्या पावसाच्या वेळी आभाळात काळे ढग भरून येतात. जणू आभाळाच्या निळ्या गाभा-यात सावळं रूप साकार उभं राहतं. त्यात पक्षी ओळीने घरी परतताना एका सुंदर मोती माळेसारखे गळ्यात रुळल्यासारखे वाटतात. तर खाली झाडे आपले फांद्याचे हात वर करून त्याचे जणूकाही स्वागत करून ओळीनं पावसाच्या वारीत सामील झाल्यासारखे वाटतात..."


सकाळी सकाळी स्वारी एकदम रोमँटिक मूड मध्ये होती...पावसाला बघण्याचे सोडून ,माझ्या ओल्या केसांकडे त्याचे एकटक बघणं, हातात हात घट्ट करणं असं त्याचं काहीसं सुरू होतं... मला तर त्या पहिल्या पावसात त्याचासोबत भिजून मजा करायची होती म्हणून, माझ्या सुपीक डोक्यात एक भन्नाट कल्पना सुचली आणि मी सहजपणे बोलली, " तुला कुठे पावसाचा आनंद घेता येतो, बघ तर इथे बसून बघतो आहेस फक्त..." 


तो जरा चिडलेल्या स्वरात म्हणाला, " कोण म्हणतं असं मला पाऊस आवडत नाही म्हणून... मला पाऊस खूप आवडतो...आणि पहिल्या पाऊस तर जीव की प्राण आहे माझा..."


" चल मग पहिल्या वहिल्या पावसाची मजा घेऊया..!" मी त्याला तिरप्या नजरेने म्हटले..!



तितक्याच पावसाचा वेगही वाढला...

मी पावसा समोर हात वर काढून त्याचे थेंब मी तळहातावर झेलत होती...हळूहळू ते पाणी त्याचा अंगावर उडवून त्याला थोडे चिडवत होती...तो ही तेवढाच खट्याळ... मी फक्त हातावरचे पाणी उडविले, त्याने तर हात ओढून सरळ पावसातच खेचले...

किशोर कुमारचा फॅन असल्याने त्याचा बेसुर आवाजत त्याचे गाणे सुरू झाले...



"रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन

भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन….


रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मन

भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन

रिमझिम गिरे सावन..."



अशी लग्ननानंतरच्या पहिल्या वहिल्या पावसाने आमच्या प्रेमाची प्रीती अजूनच बहरली...!



Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy