Jyoti gosavi

Others

2  

Jyoti gosavi

Others

बोलीभाषा

बोलीभाषा

2 mins
19


महाराष्ट्रातील विविध बोलीभाषा 

पूर्वीच्या काळी दर पाच मैला वरती बोलीभाषा बदलती असे म्हणत असत.

थोडासा लहेजा थोडेसे रीती रिवाज बदलत होते.

वलन ,वटकावन ,वषाट, दिवळी, कडूस, कोरड्यास,

हे असे काही शब्द जे कदाचित शब्दकोशात मिळणार नाहीत पण ते बोली भाषेत वापरले जातात ही भाषा आहे आमच्या सातारा जिल्ह्यातली, ही भाषा आहे पश्चिम महाराष्ट्रातली, तरीपण सातारा सांगलीतली भाषा वेगळी आणि कोल्हापूरची भाषा वेगळी त्यात पण थोडाफार फरक पडतो 


*वलन* म्हणजे एक आडवा लटकावलेला बांबू चा अर्धा तुकडा ज्याच्या वरती घरामध्ये कपडे म्हणजे फक्त वाळत घालण्याचे नव्हे, तर इतरही अंगातून काढून टाकलेले कपडे, एकावर एक एकावर एक टाकून द्यायची आणि लागतील तसे काढून घ्यायचे ती वलन


*वटकावन*

एक परातीसारखे खोलगट पितळेचे ताट ज्याला शब्दशः *पितळी* हा शब्द होता. ज्याच्या एका बाजूला लाकडी टेकण लावायचे एकाच ताटामध्ये आमटी आणि भाकरी, त्यासाठी वेगळी वाटी वगैरे घेण्याची मिजास नव्हती, ते लाकडी म्हणजे *वटकावण*


*वषाट*

हा शब्द बहुधा लोकांना माहित असावा समीष आहार म्हणजे वषाट 


*दिवळी*

दिवळी म्हणजे कोनाडा,

जेव्हा भांडी ठेवण्यासाठी, सामान ठेवण्यासाठी ,कोणती वस्तू अगदी कात्री पासून ते दिव्या पर्यंत काही ठेवण्याची गोष्ट भिंतीत काढलेली जागा म्हणजे दिवळी


*कोरड्यास*

जेवणात असणाऱ्या सुक्या भाजीला कोरड्यात हा शब्द आहे कोरडी आहे ना मग शब्दशः कोरड्यास


*कडूस* म्हणजे संध्याकाळ


मायांदाळ म्हणजे भरपूर, 

लई म्हणजे पण भरपूर,

 वाईच म्हणजे थोडं 

देव माणूस मधल्या सरुआजीच्या तोंडी बहुदा सर्व सातारी शिव्या आणि म्हणी आहेत.

टवळे ,भवाने ,गतकाळे, अवदसे, या सभ्य शिव्या.

नोकरीच्या निमित्ताने प्रथम जेव्हा कोकणात गेले तेव्हा तिथे भाषा बदलली ,भाषेचा लहेजा, पेहराव..

तिकडे गवारीला बावची ,शेवग्याच्या शेंगेला डांब, दोडका म्हणजे शिराळ, आणि प्रत्येक स्त्रीला बाई, आम्हाला कोणी सिस्टर म्हणत नसेल तर बाईच म्हटलं जाई. 

पण साताऱ्याकडेच बाई म्हटले तर मी काय ठेवलेले बाई आहे का रे? असा प्रश्न येईल? मॅडम म्हटले तर चालते. 


तर असे अनेक शब्द आणि बोली भाषेची मजा आहे. 

सातारी भाषा वाटायला कडक पण माणसं मात्र प्रेमळ असतात. तेवढीच बेरकी पण असतात.


Rate this content
Log in