डायरी ऑफ विमा

Horror Tragedy Thriller

3  

डायरी ऑफ विमा

Horror Tragedy Thriller

बसलेला म्हातारा

बसलेला म्हातारा

8 mins
281


मित्रांनो आपण कधी तरी ऐकले असेल की देवी सटवाई आपले आयुष्य लिहिते. मी तुम्हाला प्रश्न विचारतो खरच ती आपले आयुष्य लिहिते की आपल्या पुर्वकर्मांच फळ म्हणून आपल्याला या आयुष्यात भोगायला येत? असो, हा यक्ष प्रश्न आहे. आपले आयुष्य आपल्याला घडवायचे असते. जन्माला येताना आपण रिकामी पाने घेऊन जन्माला येत असतो अन आपल्या कर्मांनी आपण त्या पानांना भरत असतो. बहुतेक मी देखील पूर्व जन्मांत काहीतरी वाईट कर्म केली असतील तेव्हाच कळायला लागल्यापासून मी दु:ख आणि संकटं भोगत आलो होतो. माणसांना देवाचे अनुभव किती वेळा येत असतील? एकदा दोन दा, फार फार तर चार पाच वेळा पण मी ज्या त्रासांतून गेलो होतो त्या प्रत्येक त्रासातून प्रत्येक वेळी मला दैवी शक्तींनी वाचवलं. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ते यासाठीच. प्रयत्न च केला नाही तर आपली हाक देवा पर्यंत पोहोचेल का? सगळ्या सृष्टी वर लक्ष ठेवण्याच काम त्या भगवंताचं. त्यांच एवढ्या सहजा सहजी लक्ष जाईल का आपल्या सारख्या छोट्या जीवा कडे? पण जे देव आपल्या घरात अस्तित्वात आहेत आपल्या डोळ्यासमोर त्यांनी प्रयत्न केले म्हणून आज माझ्या चॅनेल वर मी माझी कथा तुम्हाला सांगू शकत आहे. कारण माझे पहिले दैवत हे माझे आई बाबाच आहेत. आणि आई वडीलांची पूजा केली तर देव सुद्धा आपण केलेली पूजा प्रार्थना मान्य करतात. 

खूप लहान असतानाची माझ्या सोबत घडलेली कथा जशी आहे तशी कोणतीही अतिशयोक्ती न करता म्हणजेच मनाचे काहीही अधिक न टाकता आज तुम्हाला सांगत आहे. साधारण १९९४ सालची गोष्ट आहे. दिवाळीची सुट्टी लागली होती. शाळेतून शिक्षकांनी दिलेला दिवाळीचा सर्व गृहपाठ आटोपून कधी एकदा खेळायला जायला मिळतयं असं झालं होत. आई दिवाळीचा फराळ करण्यात मग्न होती. मम्मा मी होमवर्क पूर्ण केला आहे आणि आता खेळायला जात आहे, घाई घाईने पाणी पित मी आईला सांगितले आणि घरातून बाहेर पडलो. 

ऑस्कर, सॅंड्रा, आशिष खाली वाटच पाहात होते. आज आमचा लपाछपी खेळायचा बेत होता. सॅंड्राला आम्हाला शोधायचे होते, ऑस्कर आणि अशिष म्हणाले, चल आपण तिकडे लपायला जाऊ तिथे आपल्याला शोधायला कोणीही येणार नाही. तिथे लपण्यासाठी खूप जागा आहे. आम्ही त्या ठिकाणी गेलो, नुकतीच बांधून पूर्ण झालेली एक सात मजली बिल्डींग तिथे आम्ही पाहिली. चला आपण ग्राऊंड फ्लोर ला लपून बसू. सॅंड्राला कळणार देखील नाही आपण इथे लपलोय, आशिष म्हणाला. अरे कशाला आपण इथे आलोय? ऑस्कर चल वापस चलते हैं, मी ऑस्कर ला म्हणालो. वेट यार, सॅंड्रा को पता भी नहीं चलेगा रूको यही. माझ्या कडे दुसरा काही पर्याय च नव्हता. मी नाईलाजाने त्यांच्या सोबत थांबलो. बरच वेळ झाला होता. सॅंड्राला आम्ही इथे लपून बसलोय हे माहितच नव्हतो.आम्ही अशा जागी देखील लपू शकतो अशी कल्पना पण ती करू शकत नव्हती. मुळात ती खूप भित्री होती असं ऑस्कर म्हणायचा म्हणून त्याने आणि आशीष ने मुद्दाम लपण्यासाठी अशी जागा शोधली असावी. 

पाऊण तास झाला. आशिष आता आमच्या रूम मध्ये आला. तसे पाहता बिल्डिंग च बांधकाम अजून ही अर्धवट असल्यामुळे कोणत्याही रूम ला दरवाजे नव्हते. सगळीकडे सर्व सामान अस्ताव्यस्त पडलं होत. दिवसा तर ठीक आहे पण रात्री त्या बिल्डींग मध्ये जायचं धाडस पण कोणीही करू शकणार नाही, एवढं अक्राळ विक्राळ रूप रात्री ती बिल्डींग धारण करत होती. एखादा राक्षस आपले प्रचंड अक्राळ विक्राळ रूप जसे दाखवतो त्या प्रमाणे बिल्डींग मला भासत होती आणि त्याच बिल्डींगच्या तळ मजल्याला आम्ही लपून बसलो होतो. तेवढ्यात आशिष तेथे आला. मला पलिकडच्या रूम मध्ये बघा काय मिळालयं, तो आम्हां दोघांना म्हणाला. मला तिकडे जायची मुळीच इच्छा नव्हती. पण कोणीतरी आपल्याला ओढून नेत असल्यासारखे मी त्यांच्या मागे गेलो. त्या रूम मध्ये एक पांढ-या रंगाचे कबूतर निर्जीव पडले होते. ते मेले असावे बहुतेक, त्या दोघांनी तिथे पडलेल्या लादीच्या तुकडयाने त्याला हलवून पाहिले. त्याचे दोन्ही डोळे लाल होते. हालचाल अजिबात होत नव्हती. ते पाहून मी थोडा दचकलो. ऑस्कर ने त्याच्या पायाला धरून त्याला उचलले. हमें इधर आना ही नहीं चाहिए था, मी ऑस्कर ला म्हणालो अन तुम्ही थांबत असाल तर थांबा मी मात्र चाललो घरी. असे म्हणून मी तिथून निघालो. मी निघतोय पाहून ऑस्कर आणि आशिष पण तिथून निघाले, अरे नथिंग विल हॅप्पन, ऑस्कर मला म्हणाला. चक इट, वी हव टू लिव नाऊ. मी रागात बोललो. मग आम्ही तिघेही चालत आमच्या बिल्डींगच्या खाली आलो. सॅंड्रा कधीच तिच्या घरी गेली होती. ती आम्हाला शोधून कंटाळली होती आणि आम्ही कुठे ही न सापडल्यामुळे घरी गेली. 

रात्री अचानक जाग आली. तहान लागली होती. पाणी पिऊन मी झोपायला जाणार तेवढ्यात माझे लक्ष गॅलरीमध्ये गेले. पांढरे धोतर घालून बसलेला म्हातारा मी तिथे पाहिला. मी खरोखर पाहिला की मला भास झाला कळत नव्हतं. दुस-या दिवशी सकाळी आईला मी रात्री जे काही पाहिलं त्या बद्दल सांगितलं. असं काही नसेल तू भूताचे पिक्चर पाहतोस ना म्हणून असे भास होतात तुला असं म्हणून आई तिथून किचन मध्ये निघून गेली. 

आज आम्ही चौघांनीही घरात बसून कार्टून पाहिले. काल रात्री जे घडले त्याबाबत मी कोणालाच काहीही सांगितले नाही. त्या रात्री अचानक मी झोपेत बडबडू लागलो होतो. सारखे सारखे एकच शब्द बोलत होतो की मला पांढरं धोतर घातलेला कोणीतरी म्हातारा दिसत आहे. पण आई बाबांना कितीही सांगितले तरी त्यांना काहीच कळत नव्हते, गॅलरीमध्ये असे कोणीही नाहिये, बाबा म्हणत होते. पण मला मात्र तिथे बसलेले दिसत होते. ते काय होते ते मला धड सांगता ही येत नव्हते. संपूर्ण रात्र मी बडबडत होतो. बाबांची फ़र्स्ट शिफ्ट होती. सकाळची ड्युटी असूनही बाबा मला रात्रभर मांडीवर घेऊन बसले होते. मला ताप आला होता. आर्मी क्वॉटर्स मध्ये खेळण्याची जागा असूनही आम्ही त्या दिवशी बाहेर खेळायला गेलो होतो. पण हीच इतकी शुल्लक चुक मला कुठे घेऊन जाणार होती याची कल्पना मला त्यावेळी अजिबात आली नव्हती. 

आईने मला मिलिटरी हॉस्पिटल मध्ये नेलं, ताप काही केल्या जात नव्हता. मला सतत कोणीतरी पायाला धरून ओढून घेऊन जात आहे असा भास होत होता. पण त्या वयात कसं सांगायच हे ही मला सुचत नव्हतं, मी जमेल तसं सांगायचा प्रयत्न करत होतो. डॉक्टरांनी तापवर औषधं दिली. पण प्रत्येक रात्री पुन्हा तेच तेच घडत होतं. आता मी रोज रात्र भर बड बडायला लागलो होतो. दिवसा पण चालताना वाटेच्या बाजूला एखादा दगड दिसला तरी 

असं वाटायचं तो पांढरा धोतर घातलेला म्हातारा त्या दगडावर बसलेला आहे. मी त्या दगडाला घाबरून तिथून पळून जायचो. बाबा एके दिवशी सुट्टी घेऊन मला डॉक्टरांकडे घेऊन गेले. ते मानसोपचार तज्ञ होते. मला त्या वयात मानसोपचार तज्ञ म्हणजे नेमके कोण याची तिळमात्र ही कल्पना नव्हती. तेथेही त्यांना मी तेच सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना काय उपचार करावे कळत नव्हतं. मला काही दिवसानंतर फिट यायला सुरूवात झाली. तेव्हा डॉक्टरांनी मला रोज रात्री एक गोळी चालू केली. ताप यायचा बंद झाला पण दोन तीन दिवसांनी मी पुन्हा झोपेत तेच बरळायचो. आई, बाबांना आणि ताईला ओरडून सांगायचो की मला तो म्हातारा माणूस तिथे दिसत आहे, तुम्हाला कसा दिसत नाहिये.? पण त्यांना बिचा-यांना कसे कळणार?

आर्मी एरिया मध्ये असणा-या मंदिर, मस्जिद आणि गुरूद्वारा सगळ्या ठिकाणी आई मला घेऊन जात होती. पण फरक काही केल्या पडत नव्हता. एका गुरूजींनी सांगितल्या प्रमाणे या समस्येतून बाहेर निघण्यासाठी पांढरे बुधवार व्रत आई करत होती. मला ती रोज उपवास करताना दिसत होती. पण मी ज्या त्रासातून जात होतो तो आजार कोणता आहे मलाच माहित नव्हते. मी शांतपणे आईच्या बाजूच्या सोफ्यावर पडलेलो असायचो. शाळा सुरू होऊन एक आठवडा उलटला होता. ऑस्कर, सॅंड्रा आणि आशिष एकत्र जात होते पण मी मात्र घरी बसून होतो. माझ्या होमवर्क च्या सगळ्या वह्या त्यांच्याकडे तपासायला दिल्या होत्या. पण मला मात्र आजार पणा मुळे जाता येत नव्हते. 

दोन महिने झाले, खूप ठिकाणी या त्रासाबद्दल विचारले, जे उपाय सांगतील ते केले , पण परिस्थितीत सुधारणा होत नव्हती. मन आता कंटाळलं होतं. दोन महिने शाळेत गेलो नव्हतो. घर आणि फक्त घरच. बाहेर पडलो की 

तो म्हातारा समोर बसल्याचा भास व्हायचा. जिथे नजर जाईल तिथे भिती वाटायची. म्हणून घराबाहेर पडण्याची आता भिती वाटू लागली होती. मन तर देवावरून पूर्ण पणे उडलं होत. मलाच हा त्रास का होत आहे याच कारण कळत नव्हतं. आता असं वाटू लागलं होतं की देव नसतातच. असतात तर फक्त ग्रह आणि तारे. देव असते तर दिसले नसते का? असा मी विचार करत राहायचो.

एक दिवस आई अचानक म्हणाली, चल तयार हो बाबा आले की, आपल्याला जायचं आहे. थोड्या वेळाने बाबा आल्या नंतर आम्ही तिघेही एका ठिकाणी गेलो. तिथे एक गृहस्थ रहात होते. मोठे शिवलिंग आणि दत्त महाराजांची मूर्ती तसेच कालिका मातेची प्रतिमा त्यांच्या घरी होती. सायंकाळी आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा ते सांयपूजा करत होते. माझी सर्व परिस्थिती त्या काकांना सांगितल्यावर त्यांनी काही मिनिटं डोळे बंद करून महादेवाकडे पाहिले. मला काहीच सुचत नव्हते. मी त्यांच्याकडे पहात होतो. त्यांनी आई बाबांना सांगितले की याच्यातून बाहेर पडणे अवघड आहे. त्याची आत्मशक्ती जितकी वाढेल तेवढ्या लवकर तो बरा होईल. त्या साठी त्यांनी मला एक उपाय सांगितला. जेव्हा शक्य असेल तेव्हा दत्त महाराजांचे मंदिरात जाऊन दर्शन घेणे. जेव्हा भिती वाटेल किंवा अचानक मनात भिती मनात उत्पन्न होईल तेव्हा कुळदैवतेचे नाव घेणे आणि दत्तगुरूंचे रूप सतत आठवण्याचा प्रयत्न करणे. त्यांचे रूप समोर येत नसल्यास अशा वेळी त्यांची प्रतिमा समोर ठेवून प्रार्थना करणे. रोज असे केल्याने परिस्थितीत सुधारणा होईल. पण आत्मबल आणि तपोबल वाढवावे लागेल असे त्यांनी सांगितले. त्यांनी या उपायाबरोबर आई बाबांना देखील काही उपाय करायला सांगितले. 

मग बाबांनी सांगितल्याप्रमाणे कुळदैवतांचा आणि दत्त महाराजांचा फोटो स्वत: सोबत ठेवण्यास दिले. सोबत औषधं घेत होतो. आणि जेव्हा कधी मनात अचानक भिती उत्पन्न होत होती, मी दोन्ही फोटो काढून त्यांच्या वर हात ठेवून मला वाचवा अशी प्रार्थना करत होतो. हळू हळू बदल जाणवू लागला होता. आता मनात अचानक उत्पन्न होणारी भिती कमी होऊ लागली होती. बर वाटत होतं. काही दिवसांनंतर मी शाळेत पुन्हा जाऊ लागलो. त्या नंतर पुन्हा कधीही मी त्या बिल्डींग कडे फिरकलो नाही. दोन वर्षां नंतर बाबांची पोस्टींग झांसी ला झाली आणि आम्ही तिकडे काही वर्षांसाठी तिकडे रहायला गेलो. मी जे अनुभवले ते त्या वेळी मला शब्दांत सांगता येत नव्हते. तो म्हातारा कोण होता हे आज आठवले तरी अंगावर काटा येतो. कधी न उलगडणारं कोड होतं ते, कबुतर होत कि म्हातारा? पण आज ही मन घाबरत ते आठवलं की. माझ्या आयुष्याचं प्रत्येक पान हे अशा घटनांनी भरलेलं आहे. माझे पूर्व जन्मींचे कर्म, मला हा भक्ती चा मार्ग मिळाला. सदैव ऋणी राहतो त्यांचा ज्यांनी सदैव मला साथ दिली. म्हणूनच तुम्हाला ही हेच सांगेणं की भक्ती मार्ग कधीही सोडू नका. 

आयुष्यात कितीही वाईट प्रसंग आले तरी त्या प्रसंगातून बाहेर काढणारा ही तोच आहे. वडील जसे स्वत: च्या लेकराचे प्राण घेत नाहीत तसेच त्यांना शरण आलेला प्रत्येक जीवाचे रक्षण करणे हे त्यांचे परम कर्तव्य आहे. अन त्यांचे नामस्मरण एकदा जरी मनापासून केले असेल तर ते आपल्याला वाचवणारच.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror