Mahananda Bagewadi

Others

2  

Mahananda Bagewadi

Others

देशभक्ती

देशभक्ती

2 mins
227


सर्व प्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्रता दिवसाच्या मनापासून शुभेच्छा “


द्या सलामी हया तिरंग्याला 

त्याच्याचमुळे आपली शान आहे,

नेहमी मान उंच ठेवूया याची 

जोपर्यंत आपल्यात प्राण आहे..


लहानपणी 15 ऑगस्ट, 26 जानेवारी हे दिवस म्हणजे शाळेत सकाळी लवकर उठून जाणे, कवायत करणे, देशावर गाणी गाणे आणि खाऊ घेऊन घरी येणे इतकंच कळत होतं, पण जसे जसे मोठे होत गेले तसे हया दिवसांचे मोल समजु लागले.

आजही देशात बर्याच ठिकाणी हया दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते, 

भाषणं, कवायत, स्पर्धा, तसेच आदरांजली पासून ते अगदी श्रद्धांजली पर्यंतच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. पण मला सांगा फक्त हेच दिवस देशभक्तीसाठी राखून ठेवले आहेत का आपल्या सारख्या सामान्य माणसांसाठी? 

देशभक्ती ही फक्त आपल्या सीमेचे रक्षणासाठी सतत सीमेवर कार्यशील असलेल्या त्या नौदल, वायुदल आणि भूदला वरील सैनिकांनाच लागु आहे का? हे फक्त त्यांच कर्तव्य आहे का? हया प्रश्नाचं उत्तर शोधत असताना बर्याच गोष्टीचा उलगडा झाला.. 

देशभक्ती म्हणजे नेमके काय?

"देशभक्ती म्हणजे आपण ज्या देशात राहतो त्या देशाच्या हितासाठी योग्य आणि आवश्यक ते कार्य करणे होय".

मग त्यात कचरा योग्य ठिकाणी टाकणे, एखाद्या दुर्बल प्राणी, दुर्बल व्यक्तीची मदत करणे, पाण्याचे अपव्यय टाळणे, विजेचा योग्य आणि गरजेपुरतेच वापर करणे, झाडे लावणे, आपल्या भोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे, परदेशी मालाऐवजी स्वदेशी मालास प्राधान्य देऊन लोकांना स्वदेशी माल घेण्यासाठी जागरूक करणे, असे बरेच कार्य जे योग्य आणि चांगल्या उद्देशाने करणे म्हणजे खरी देशभक्ती होय.

आपल्या भारत देशाचा इतिहास पाहिला तर कित्येक जवानांनी, महान नेत्यांनी आपले प्राण प्रणाला लावून आपल्यांना स्वातंत्र्य मिळवून दिले, ती होती त्यांची देशभक्ती....

पण आपल्यांना स्वातंत्र्य मिळालय ते फक्त इंग्रजांच्या गुलामगिरीतुन...

विचार करा आजही महिन्याच्या बाळापासून ते वयस्कर स्त्री पर्यंत त्यांच्यावर बलात्कार होतात, स्त्रीयाच नाही तर कधी कधी पुरुषही लैंगिक शोषणास बळी पडतात, आजही स्त्रीभ्रुण हत्या केली जाते , जिथे आजही काही गावांमध्ये मुलभुत गरजा पुरेशा प्रमाणात पोहचत नाहित तर सांगा आपण खर्या अर्थाने स्वतंत्र झालोय का? 

तर अशा समस्यांवर विचार विनिमय करुन योग्य तो तोडगा काढणे म्हणजे खरी देशभक्ती होय...

आपण मात्र हा सगळा विचार न करता What's app, Facebook आणि इतर सोशल मिडियाला बळी पडुन तिथले पोस्ट पुढे पाठवत असतो , विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे हल्ली लोटलेल्या पुरात पुढे सरसावलेल्या हातांनी जर What's upp आणि Facebook बघत बसले असते तर काय झाले असते हे आता वेगळ सांगायची गरज नाही... खर्या देशभक्तीच उदाहरण याहून चांगल नसेलच कुठे..

अशाप्रकारची निस्वार्थपणे केलेली देशभक्ती प्रत्येक माणसाने अंगीकारली तर हा आपला भारत देश जगात प्रगती पथावरील प्रथम क्रमांकाच देश असेल..

आपला देश हा वेगवेगळ्या जातीच्या, धर्माच्या, प्रांतांच्या भाषेच्या लोकांपासून बनला आहे.. पण प्रत्येकाची जन्म आणि कर्म भुमी ही भारत माता आहे हिच्या सुरक्षिततेसाठी जात पात धर्माच्या विरोधात ऊठलेला माणुसकीचा तो प्रत्येक हात म्हणजे देशभक्ती होय...

तर चला सख्यांनो करुया का सुरुवात आजपासून या भक्तिला....

देऊया वारा या माणुसकीच्या शक्तिला...

देऊया वारा या माणुसकीच्या शक्तिला...


Rate this content
Log in

More marathi story from Mahananda Bagewadi