Jyoti gosavi

Others

4.0  

Jyoti gosavi

Others

दिवाळी गोड झाली

दिवाळी गोड झाली

3 mins
207


 सणाचा राजा म्हणजे दिवाळी, 

दिवाळी सुरू झाली, जागोजागी किल्ले उभे राहू लागले. 

नवीन कपड्यांची खरेदी सुरू झाली .

घराघरातून भाजण्याचे, मसाल्याचे, तळण्याचे, वास येऊ लागले. सगळीकडे सणाची लगबग दिसू लागली. 

सगळीकडे दुकानांवर रोषणाई, घराघरांमध्ये आकाश कंदील, आणि रोषणाई दिसू लागली . .

पण एका घरात मात्र अजून काही यातलं काहीच दिसत नव्हते. 


ते जर सुजाताच होतं. सुजाता आणि सरिता अशा या दोन बहिणी, लहानपणापासूनच समंजस होत्या .

त्यांना कोणत्याही गोष्टीचा हट्ट करणे माहित नव्हते.या या गोष्टी मागाव्यात, आई-वडिलांकडे हट्ट करावा हे त्यांना माहीतच नव्हते. वर्षातून कधीतरी एक दोन वेळा त्यांना कपडा मिळत असे. आणि बाकी जेवणात आमटी भाकरी त्या खुश असत. 

त्यांना मात्र बाहेरची रंगरंगोटी ,आणि रोषणाई याची खुशी वाटत होती. आजूबाजूला किल्ला करणाऱ्या मुलांमध्ये जाऊन त्या रममाण होत होत्या. इतर मुलं फटाके वाजवत होती ,आणि त्या फटाक्यातून खाली राहिलेल्या फुसक्या गोळा करून त्या शेकोटीमध्ये घालून फटाक्याचा आनंद लुटत होत्या. 

इतर मुलांनी घातलेल्या नव्या कपड्याचा कोरा करकरीत वास छातीमध्ये साठवून घेत होत्या. 

यांच्या घरात अजून फराळाचे पदार्थ बनलेच नव्हते. 

सगळ्यात स्वस्त आणि घरी असणाऱ्या सामानात बनणारा पदार्थ, म्हणजे कापण्या . 

घरामध्ये असणाऱ्या गव्हाच्या पिठामध्ये ,गुळाचे पाणी टाकायचे, पीठ मळायचे, आणि त्याच्या शंकरपाळी सारखे तुकडे करून तळून घ्यायचे .

सण आहे, मुलांच्या तोंडाला काहीतरी गोड लागावे म्हणून, आईने थोड्याशा कापण्या बनवल्या होत्या. 

********************

वडील सगळीकडे वणवण फिरत होते ,कुणाला उधार उसनवार मागत होते .

पण यावेळी कुठूनच काही मिळत नव्हतं .

त्यांचा स्वतःचा शिलाई चा धंदा होता , सण वाराला लोकांनी भरपूर कपडे शिवून नेले होते.,परंतु उधारीवर . 

त्यांची उधारी कोणी देत नव्हते. त्यांचा हक्काचा पैसा त्यांना मिळत नव्हता. कारण सगळेच गरीब, हातात येणार /तेव्हा देणार. 


शेवटी समोर एक आईच्या वयाच्या आजीबाई राहायच्या. त्यांच्याकडे जाऊन वडील बसून ढसाढसा रडले. 


आज माझ्या गरिबीमुळे, माझ्या मुलींना मी आज नवीन कपडा घेऊ शकत नाही, का दोन गोडधोडाचे घास त्यांच्या मुखी घालू शकत नाही. 

लांछन आहे माझ्यावरती !मी संसारात पडायलाच नको होतं .असे स्वतःलाच दोष देऊ लागले. 

 शेवटी आजींनी आपली पेटी उघडली, त्यातून एक दहाची नोट काढली ,आणि सांगितले. 

 बामणा!एवढ्या रुपयात काय होईल तेवढे सामान भर! 

तसे तेव्हा दहा रुपये देखील पुष्कळ होते. 

आजी! तुमचे पैसे मी माझे उधारी आली की परत करेन. 


असं सांगून तिथून उठून ते घरी आले, आणि घरात येऊन बघतात तर काय? अक्कू आणि बक्कू  गोष्टी सारखं झालं होतं. आणि त्यांचाच एक मोठा भाऊ अचानकपणे यावर्षी दिवाळीसाठी म्हणून आला होता. 

येताना त्यांनी आपल्या दोन्ही पुतण्यांना कपडे, भावजईला साडी ,आणि बॅग भरून फटाके ,आणि मिठाई आणली होती. 

शिवाय घरी आल्यावर ती दिवाळीच्या सामानाला पैसे देखील दिले. 

शिवाय बासुंदीचा बेत करण्यासाठी दुधाला पैसे दिले ,आणि वडिलांचा या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. 

शेवटी ते म्हणाले माझ्या पांडुरंगा ने माझी लाज राखली. 

सुजाता आणि सरिताच्या हातावरती मिठाई ठेवली, आणि फटाक्याची बॅग त्यांच्यापुढे उघडून ठेवली. पोरी अत्यंत खूष झाल्या, आणि त्या दिवशी संध्याकाळी आजपर्यंत कधी न पाहिलेले भुईचक्र, सापाची गोळी, पाऊस, लवंगी फटाके ,लक्ष्मी बॉम्ब, हे सारे फटाके आज त्यांच्याकडे होते. 

आणि त्यांना आपण जगातील सगळ्या त श्रीमंत आहोत असे वाटत होते. सगळ्या घरादाराचा दिवाळीचा आनंद जिगुनित झाला होता. 

आणि असा तो दिवाळीचा सण त्या दिवशी मोठ्या आनंदाने साजरा झाला. 

दिवाळी गोड झाली होती


Rate this content
Log in