Shila Ambhure

Inspirational

3  

Shila Ambhure

Inspirational

दृष्टी

दृष्टी

1 min
315


    सिग्नलचा लाल दिवा पाहून रमेशने गाडी थांबवली आणि सहज इकडेतिकडे बघू लागला. बाजूलाच एक वृद्ध जोडपे रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या हालचालीवरुन त्या दोघांची दृष्टी कमी असावी हे रमेशला समजले. तो लगेच गाडीतून उतरला.दोन्ही वृद्धांच्या हाताला धरले व त्यांना सावकाश रस्ता पार करून दिला. जोडप्याने रमेशचे आभार मानले आणि रमेशने त्या अज्ञात दात्याचे मनोमन अनंत आभार मानले ज्याच्यामुळे त्याला ही नव 'दृष्टी' मिळाली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational