Vanita Bhogil

Horror

3.9  

Vanita Bhogil

Horror

एक अतृप्त इच्छा

एक अतृप्त इच्छा

8 mins
175


आज त्याला जरा जास्तच भीती वाटत होती ,तसा त्याच्यासाठी ती वाट नवीन नव्ह्ती.

पण गेले दोन दिवस जे काही घडत होतं ते खूप भयावह होत त्याच्यासाठी..

 मयंक.... ऑफिस वरून सुटल्यावर स्टेशन वरून चालतच घरी यायचा, घर आणि स्टेशन जास्त अंतर नसल्यामुळे बस किंवा रिक्षा ची वाट बघणे त्याला आवडत नसायचे..

जास्त रहदारी नसलेली वाट तशी दिवसभर थोडीफार वाहन ये जा करायची ,पण संध्याकाळी सात नंतर किंचित कुणी तरी त्या वाटेनं येणार जाणार दिसायचं,

मोठा रस्ता होता पण चालत जाण्यासाठी ही वाट जवळची पडायची म्हणून मयंक याच वाटेने ये जा करायचा..

 दहा दिवसापूर्वी सोसायटीतील सीमाने गळफास घेऊन आत्महत्या केली,सीमा बावीस वर्षाची अविवाहित तरुणी, आईवडील लहान असतानाच देवाघरी गेले सध्या ती काका कडे राहायची,सगळी काम करायची आणि काकू देईल ते खायची,

काकू तशी खडूस पण काका खूप प्रेमळ होता,

काका तिच्यासाठी लग्नाची स्थळ शोधत होता, घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे बऱ्याच स्थळाकडून नकार येत होते, 

काकू दिवसभर टोमणे मारायची,अपशकुनी, आमच्या जीवावर खाते अस तीच रोजचंच जगणं झाल्यामुळे तिला त्याची सवय लागून गेलेली,,

सीमा दिसायचा सावळी होती पण आकर्षित सुंदर चेहरा, लांबसडक केस, मध्यम उंची आणि सुडौल शरीर ...

 तशी जास्त कुणात मिसळत नसे,

अबोल स्वभावाची होती, 

मयंक ऑफिस ला जाताना ती गॅलरीत कपडे वाळत घालण्यासाठी हमखास असायची, 

समोरासमोर घर असल्यामुळे दोघांची नजरभेट रोजच व्हायची....

मयंक कधी तसाच निघून जायचा तर कधी स्माईल द्यायचा,,,,

 तिच्या मनात काय होत देव जाणे...


आत्महत्या केली तेव्हा सोसायटीत लोक चर्चा करत होते ,कोणी म्हणे काकूंच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली तर कुणी म्हणे लग्न जमेना म्हणून आत्महत्या केली.. तर कुणी म्हणे तीच कुणावर तरी प्रेम होतं ,त्याने नकार दिला म्हणून आत्महत्या केली.....

आत्महत्येचं कारण तस समजलं नाही....

 या घटनेला दहा दिवस उलटून गेले ,तिने आत्महत्या केली त्यानंतर मयंक ही काहीतरी मिस करत होता....

 दोन दिवसांपूर्वी , आठ वाजले असतील,तो ऑफिस वरून येत असताना त्याच रोजच्या वाटेने त्याच्या मागे काहीतरी सरपटत असल्याचे त्याला जाणवले...

सहज मागे वळून पाहिले तर काहीच नव्हते, 

थोडं पुढे गेल्यावर आणखी तसाच सरपटल्याचा आवाज आला, 

आता थोडं त्याला विचित्र वाटलं करण त्या सरपटणाऱ्या आवाजासोबत त्याला त्याच्या नावाने कुणीतरी हळू आवाजात बोलवल्याचा भास झाला ,,,,

 त्याला भीती वाटू लागली.....

हिम्मत करून मागे वळून पाहिलं पण काहीच नव्हतं, त्याला वाटले भास झाला असावा.....

विचार झटकून झपाझप पावले टाकत मयंक घरी गेला....

    दुसऱ्या दिवशी परत तेच घडले ,,, कालच्या पेक्षा आज आवाज जवळून येत असल्याचा भास झाला.....

मयंक ला घाम फुटला......

मागे वळून न पाहता तसाच घराकडे घाईत गेला....

  आजचा तिसरा दिवस ,आज त्याच वाटेने जायची मयंक ला भीती वाटत होती....

 पावसाळा असल्यामुळे वातावरण अजूनच भयावह वाटत होते, ढग दाटून आले होते, रिमझिम पाऊस सुरू झाला होता...

बस रिक्षाची बराच वेळ वाट पाहून काहीच मिळत नसल्यामुळे नाईलाजाने तो त्याच वाटेने निघाला...

थोडस अंतर गेलं तसा मागून आवाज आला अहो थांबा न थोडं, बोलायच आहे...आवाज लेडीजचा होता ,मयंक जागीच स्तब्ध झाला....


 वळून पाहण्याची हिम्मत नव्हती, 

रिमझिम पावसाच्या थंड वतातवरणातही मयंक ला दरदरून घाम फुटला.....

 परत आवाज आला अहो सर थोडं काम आहे थांबता का??

 आता आवाज अजूनच जवळून येत होता...

मयंक जाग्यावर डोळे बंद करून भीतीने थरथर कापत होता...

तस कुणाचा तरी खांद्याला स्पर्श झाल्याची जाणीव झाली....

 मयंक ने घाबरून डोळे उघडले....

 शेजारी एक तरुणी उभी होती,

 मयंक तिच्याकडे बघतच राहिला, 

वाटेवरील दिव्याच्या अंधुक प्रकाशात ती तरुणी इतकी सुंदर होती की काही क्षण आधी भीती वाटत होती हे मयंक पूर्ण विसरून गेला....

रंगाने गोरीपान ,घारे डोळे, काळेभोर कमरेपर्यंत केस, सडपातळ शरीर,जसे की (फुरसत से उपरवाले ने बणाया होगा)

मयंक तिच्याकडे एकटक बघत होता..तशी ती म्हणाली माझं घर बरच लांब आहे,इकडून रिक्षा, किंवा बस काहीच मिळेना .

मी इथे नवीन असल्यामुळे मला इकडेच फारस काही माहीत नाही....

वाटेने कुणी दिसेना ,थोडं अंतर चालल्यावर तुम्ही दिसलात म्हणून आवाज दिला, काळोख आणि पाऊस असल्यामुळे मला भीती वाटत होती....

 सॉरी पण मला माझ्या घरापर्यंत सोबत येऊन सोडल का?ती काय बोलते हे मयंक च्या कानापर्यंत पोहचतच नव्हते...

तो फक्त तिच्या चेहऱ्याकडे बघत होता, ती बोलते त्या ओठांची हालचाल त्याला आकर्षित करत होती......

 तिने पुन्हा विचारले हॅलो ऐकताना???


तंद्रीतुन बाहेर येऊन मयंक म्हणाला काही म्हणालात का तुम्ही?

ती तरुणी हसली आणि म्हणाली,माझं घर लांब आहे आणि मी एकटाच आहे,वाटेने मला सोबतीला कोणी नाही तुम्ही याल का माझ्यासोबत ???

मयंक लगेच म्हणाला ... हो तर येईल न ,मला ही आवडेल सोबत चालायला....

  आता पावसाचा चांगलाच जोर वाढलेला...

दोघे निघाले, मी नीलिमा तिने तिची ओळख करून दिली, मी मयंक ...

एवढेच बोलून दोघेही चालत होते.... 

विजा कडकडत होत्या, पाऊस धोधो पडत होता, पावसामुळे लाईट्स गेल्या होत्या ,वाटेवरील दिवे गेले होते,

   पावसात मोबाईल ची बॅटरी चालू करून दोघे चालत होते...

पाऊस आणि जोराचा वारा वाहत होता, निलिमाचे छत्री वाऱ्यासरशी उलटून पडली ,पाऊस मोठा येत असल्याने मयंक ने लगेच स्वतःकडची छत्री तिच्या डोक्यावर धरली,या सगळ्यात दोघांचेही कपडे बरेच भिजले....

पाऊस वाढतच होता... 

थोड्या अंतरावर मयंक चे घर होते,

मयंक म्हणाला मी तुम्हाला सोडून परत येतो ,पाऊस खूपच येत आहे, तस तुमचं घर अजून किती लांब आहे...

 त्यावर नीलिमा म्हणाली बरेच पुढे आहे पण जर तुमची काही हरकत नसेल तर पाऊस कमी होईपर्यंत मी तुमच्या घरी थांबू का?? म्हणजे तुम्हाला काही अडचण नसेल तर.....

पाऊस कमी झाला की मी जाईल एकटी..

मयंक ला मनातून खूप आनंद झाला होता,नीलिमाला पाहताक्षणी तो प्रेमात पडला होता... 

अंधारात ही ती किती सुंदर दिसत होती हाच विचार त्याच्या मनात होता...

 तो लगेच म्हणाला ,, चालेलं न त्यात काय त्रास, थांबू शकता तुम्ही माझ्या घरी...

 दोघेजण मयंक च्या घरी आले,निलिमाचे विचारले, एकटेच राहता?? 

हो .. नोकरीसाठी मी शहरात आलो घरचे सगळे गावी असतात.

 त्याने तिला केस पुसण्याकरता टॉवेल आणून दिला आणि फ्रेश होण्याकरिता आत गेला...

 फ्रेश होऊन आल्यावर चहा घेणार का ? मयंक ने विचारले, 

हो चालेल थोडासा......

 चहा टाकत किचन मधूनच मयंक नीलिमाशी बोलत होता..

 चहाचा कप पुढे करत मयंक म्हणाला तुम्ही एकट्याच राहता??

 नीलिमा म्हणाली हो सध्या एकटीच आहे, 

मयंक...

लग्न??

नाही.. माझं एका मुलावर खूप प्रेम होतं पण त्याने नकार दिला...

बोलताना निलिमाचे डोळे भरून आले...

सॉरी मी उगीच विचारले..

 मयंक मनातल्या मनात म्हणाला कोण मूर्ख असेल एवढ्या सुंदर मुलीला नकार देणारा..

पण बरच झालं, नाहीतर आज आमच्या गाठीभेटी कश्या झाल्या असत्या..

 चहा पिऊन झाला, पण पावसाचा जोर काही कमी होत नव्हता...

 एवढ्या वेळेत दोघेही छान जुने मित्र असल्यासारखे comfortable झाले होते...

अंगावरील कपडे ओले असल्यामुळे नीलिमाला थंडी वाजू लागली..

 

मयंक म्हणाला घरात लेडीज नाहीत त्यामुळे तुम्ही माझे टीशर्ट आणि ट्रेक घाला.. अंगावरील कपडे वाळत घाला ,पाऊस कमी होईपर्यंत वाळतील, नाहीतर ओल्या कपड्यामुळे आजारी पडाल....

नीलिमा हो म्हणाली..

या चेंज करून घ्या मी कपडे कपाटातून काढून देतो..

 मयंक बेडरूममध्ये गेला,नीलिमा ही पाठोपाठ गेली, तो कपडे काढत होता, तेवढ्यात जोरात वीज कडाडली, निलिमाने घाबरून मयंक ला मिठी मारली, मयंक ने निलिमाकडे पाहिले,तिने डोळे घट्ट बंद करून घेतले होते..

 तिच्या मनमोहक चेहऱ्याकडे मयंक पाहत होता, केसांची बट गालावरून रुळली होती...

हाताने केसांची बट मयंक ने मागे सारली,त्याच्या नाजूक स्पर्शाने ती मोहरून गेली, नकळत त्याच्या कुशीत अजूनच स्थिरावली...

 विजेचा कडकडाट कमी झाला , लाजून नीलिमा थोडी दुर झाली, 

सॉरी मयंक... मला विजांच्या आवाजाची खूप भीती वाटते.... 

इट्स ओके, पण त्या विजांमुळे तू जवळ आलीस..

 अस म्हणून मयंकने तिला जवळ ओढले.

  ती काही बोलणार एवढ्यात त्याने ओठ तिच्या गुलाबी ओठावर टेकवले,ती रोमांचित झाली...


काही सेकंद दोघे वेगळ्याच दुनियेत गेले...

नीलिमा भानावर येत दूर झाली ,तस मयंक म्हणाला तुला पाहून अस वाटत खूप जुनी ओळख आहे आपली...

 त्यावर ती नुसतीच हसली.....

 पुन्हा पावसाने जोर धरला आणि नीलिमा मयंक च्या कुशीत शिरली...

 आता दोघेही पावसाप्रमाणे बेधुंद झाले होते, 

काही तासाच्या ओळखीचे रूपांतर खूप पुढे गेले होते...

  दोघेही शरीराने एकरूप झाले होते,

त्या रोमँटिक क्षणी मयंक म्हणाला नीलिमा माझ्या आयुष्यात या आधीच का नाही आलीस,किती उशीर केला..

   नीलिमा म्हणाली मी तर कधीपासून तुझीच आहे ,तुलाच नको होते....

    वेगळ्या धुंदीत असल्यामुळे मयंक ने बोलण्याकडे लक्ष दिले नाही......

    जाग आली तेव्हा मयंक ने घड्याळ पाहिले सकाळचे आठ वाजले होते, अरे खूप उशीर झाला उठायला, 

स्वतःशीच बडबडत तो बेडवरून उठला..

डोकं जड झालं होतं...

तो इकडे तिकडे निलिमाला शोधू लागला,ती घरात कुठेच नव्हती..

 नीलिमा गेली की काय? पाऊस थांबल्यावर बहुतेक गेली असावी,

 पण मग मला का नाही उठवले तिने?

कदाचित झोपमोड होईल म्हणून नसेल उठवले...

 स्वतःशीच मयंक बोलत होता...

खूप सुंदर आहे नीलिमा,,, मनात आनंदी होता..पण मग मी एवढा अचानक तिच्याकडे कसा काय आकर्षित झालो आणि तिने ही थोडाही प्रतिकार केला नाही..

  नवीन ओळख आणि अस कस होऊ शकत...

स्वप्न होत की खरच अस घडलंय या विचारात तो खुर्चीत डोक धरून बसला होता.

  सोसायटीच्या आवारातून कसला तरी गोंगाट ऐकू आला म्हणून तो गॅलरीत जाऊन पाहू लागला, समोर सहज लक्ष गेलं तर गॅलरीत सीमा उभी होती.काहीतरीच काय? ही तर मेली आहे इथे कशी असेल....

भास होत आहे मला....अस म्हणून मयंक खाली गेला...

गर्दी जमलेली होती काय झालं आहे असं मयंकने विचारले पण कुणी काही उत्तर देईना...

  प्रत्येक जण म्हणत होता हे काय वय आहे का आत्महत्या करण्याचं.....

   का बरं केली असेल आत्महत्या याने, गुणी पोर होता... आजी काकू यांच्या तोंडून ऐकू येत होते पण कुणी आत्महत्या केली हे समजेना.....

   मयंक गर्दीत वाट काढत पुढे गेला, जे पाहिलं ते भयानक होत... तो स्वतःलाच जमीवर पडलेला पाहत होता...

  डोक्यातून रक्त वाहून सुकून गेलेलं....

 हे कसं शक्य आहे?? मी तर जिवंत आहे...

ओरडून सांगत होता पण त्याचा आवाज कुणाला ऐकू जात नव्हता.....

   तो पुन्हा धावतच आपल्या रूम मध्ये आला, पाठमोरी नीलिमा उभी होती...

 त्याच्या जीवात जीव आला..

नीलिमा आग कुठे गेली होतीस ? आणि खाली पाहिल का ? लोक काय म्हणत आहेत.

   मी त्यांना सांगतोय मी जिवंत आहे पण कुणी ऐकतच नाही....

बर झालं तू आलीस. तुला तरी समजतंय न मी काय म्हणतोय ते...

 नीलिमा वळून नुसतीच हसली..

 खाली पडलेला तूच आहेस मयंक.

 अरे पण कस शक्य आहे?

रात्रभर आपण सोबत होतोत, 

नीलिमा फिदीफिदी हसली आणि म्हणाली हो सोबतच होतोत पण मला तू कायमचा हवा होतास..

 आग मग आपण लग्न करूया...

 विचित्र हास्य करून ती म्हणाली आता त्याची गरज नाही, कारण आपण आता कायम सोबत असू...

  म्हणजे???

तिने मोठ्याने हसण्याचा आवाज केला आणि क्षणात तीच रूप क्षणात पालटलं, आता तिच्या जागी सीमा दिसत होती.

  हे कसं शक्य आहे?????

 मयंक भीतीने कापत होता. सीमा हास्य करून म्हणाली घाबरू नकोस मयंक, मी तुला काहीही करणार नाही.. 

आणि तू म्हणालास हे कसं शक्य आहे तर मी तुझ्यावर खूप प्रेम करते, तू मला सावळी म्हणून माझ्या प्रेमाला नकार दिलास, बावळट म्हणालास मला. मी खूप स्वप्न पहिली होती तुझ्यासोबत जगण्याची पण तू क्षणात सगळं .........….....

 म्हणून मी आत्महत्या केली, पण काय करू तुझ्यावर एवढं प्रेम करते की तुझ्याशिवाय मला मुक्ती मिळेना, माझा आत्मा तुझ्याभोवती घिरट्या घालत होता.. आपली रात्र खूपच छान गेली पण मला तू कायमचा सोबत हवा होतास.. म्हणून मीच तुला तू झोपेत असताना गॅलरीतून खाली फेकले..

आपण आता कायम सोबत राहू, माझी अतृप्त इच्छा पूर्ण झाली, मोठमोठयाने सीमा विचित्र हसत होती तर मयंक रडत होता....

   मी जिंकले माझं प्रेम जिंकलं अस सीमा म्हणत हास्य करत होती...

 आपण आता याच घरात वास्तव्य करू कायमच .......

 मयंक मरून ही अजून मरणाची वाट पाहत होता सुटका कशी होणार म्हणून रडत होता.....

    (समाप्त)


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror