Smita Bhoskar Chidrawar

Inspirational Others

3  

Smita Bhoskar Chidrawar

Inspirational Others

एक क्षण मोहाचा....

एक क्षण मोहाचा....

2 mins
212


मीरा एक अल्लड वयातली सुंदर मुलगी...पण बिचारी परिस्थिती ने ग्रासलेली होती .म्हणून इतर मुलींसारखी मस्त नाटण्या थटण्याची हौस नेहेमीच अपूर्ण राहायची..बाकी काही नाही तरी पावडर आणि लिपस्टिक तरी हवीच अस तिला नेहेमी वाटायचं...

राधाबाई घरासाठी खूप राबायच्या...सात घरी स्वयंपाक करता करता जीव मेटाकुटीला यायचा पण पर्याय नव्हता...नवऱ्याच्या व्यसनापायी होतं नव्हतं ते सगळं गेलं आणि एक दिवस नवराही कायमचा सोडून गेला...

मोठ्या पोराला काहीतरी कामधंदा शिकवावा म्हणून राधा बाईंनी त्यांच्या भावाकडे पाठवला होता...आता मिराचं लग्न चागल्या घरी लाऊन दिलं की त्या मोकळ्या होणार होत्या...

आज प्रधानाकडे कार्यक्रम होता , जास्तीचं काम आणि पैसेही जास्त मिळणार म्हणून राधाबाई बाकीच्या घरी सुट्टी घेऊन प्रधानाकडे दिवसभर कामाला थांबणार होत्या मिराही आज आईच्या मदतीला आली होती...जमलेल्या पैशातून मीरासाठी छान ड्रेस आणि तिला हवी ती लिपस्टिक, पावडर घेऊन द्यायची असं मनोमन त्यांनी ठरवलं होतं...लेकीची नटण्याची हौस त्या भगवणार होत्या...

पाहुणे येत होते...सगळेच गडबडीत होते ...कोणाचं लक्ष नाही हे पाहून मीरा प्रांजली मॅडम च्या रूम मध्ये कपडे आवरता आवरता सहज तिथे पडलेल्या मेक अप च्या वस्तुंकडे डोळे भरून पाहत होती...किती छान होतं सगळं ...एकापेक्षा एक महागड्या वस्तू... मिराचा स्वतः वरचा ताबा सुटला आणि तिने पटकन तिथली एक लिपस्टिक उचलून ओढणीत लपवली...


राधाबाई गरीब होत्या तरीही त्यांनी मुलांना उत्तम संस्कार दिले होते पण आज मोहापायी राधा चूक करून बसली होती...दुसऱ्या दिवशी राधाला लेकीची करतुद समजली आणि त्यांना खूप वाईट वाटलं... स्वतःचा आणि लेकीचाही खूप राग आला ....

" अग काय करून बसलीस हे ? गरीब असलो तरीही इज्जत आहे आपल्याला...अश्या मोहापायी आयुष्य बरबाद करून घेशील ग बाई...अशीच सुरुवात होते...बाईच्या जातीला सयांम हा हवाच...ते काही नाही आताच्या आता चल आणि मॅडम ची माफी माग..."

मीरा तयार नव्हती...तिने आपली चूक मान्य केली नाही...झाल्या प्रकाराची लाज वाटण्यापेक्षा तिने आईला दोष दिला तशी राधाबाईनी तिच्या मुस्काटात मारली आणि ओढतच तिला घेऊन गेल्या...

प्रांजली मॅडम समोर मीराला उभी करून राधा बाईंनी सगळं सांगितलं आणि मिराने त्यांची पाय धरून माफी मागीतली...

प्रांजली मॅडम ला राधाबाई आणि मीराचा खूप अभिमान वाटला...त्यांच्या प्रामाणिक पणाबद्दल शाबासकी देऊन त्यांनी आपला नवा इम्पोर्टेड मेक अप किट मीराला बक्षीस म्हणून दिला...आणि खुप आशीर्वाद सुद्धा...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational