komal Dagade.

Drama Tragedy Others

4.0  

komal Dagade.

Drama Tragedy Others

एक नवी सुरुवात....

एक नवी सुरुवात....

4 mins
376


आज संध्याकाळी तेजाला ऑफिस वरून येईला आठ वाजले. बाहेर अंधार पडून गेला होता. संध्याकाळी येताना विचार करतच मनात म्हणाली पटकन जाऊन स्वयंपाक करायचा, " भुकही तिला जोराची लागली होती. कारण ऑफिसमध्ये काम असल्याने आज तिला जेवायलाही वेळ मिळाला नव्हता.


घरी आल्यावर फ्रेश होऊन तेजाने चहा ठेवला.सासूबाईंनाही नेऊन दिला. चहा घेतला सासूबाईंनी पण तिच्याकडे बघितलेही नाही. ती काहीही त्यांच्याकडून अपेक्षा न ठेवता किचनकडे वळाली. चहा पटकन संपवला आणि स्वयंपाक करायला घेतला. फ्रीज उघडला तर भाज्याचा कप्पा पूर्ण रिकामा दोन टोमॅटो, शिवाय काही दिसत नव्हतं. तिने डोक्याला हातच लावला, " काय भाजी करावी तिला सुचेना. तिच्या लक्षात आले तेलंही संपलय कारण आठवडा झाला तरी नवऱ्याने बाजार आणला नव्हता. नवऱ्याच्या अपेक्षा तू कमवतीस ना...!घरातील लागणाऱ्या वस्तू तूच पाहायच्या.


तेजाच लग्न लव्हमॅरेज झालं आणि सून म्हणून घरात आली. शिकलेली जॉब करणारी मुलगी मिळाली म्हणून,तिचा नवरा विकास खूप खुश होता. पण त्या मागचं कारण वेगळच.


एकदा घरातील पीठ संपलंय..!, "असं सासूबाईंना सांगताच सासूबाई तर सरळ म्हणाल्या, खायला लागतंय ना मग आणून करायचं खायचं आणि सर्वाना घालायचं. एका महिन्यातच माणसांची खरे चेहरे कळाले.


त्यानंतर विकास कधीच तेजासाठी कसलाच खर्च करायचा नाही. स्वतःमात्र बाहेर चांगलं खायचा पण बायकोला एक रुपया मोडायचा नाही. कधी कधी तर तिच्याकडून पैसे काढण्यासाठी तिला चिडचिड करायचा. नाही तसलं बोलून तिला प्रचंड मानसिक, शारीरिक त्रास देईचा. सासूबाई तर एका कामाला हात लावत नसे, पण स्वयंपाकात मात्र सतत चुका काढत असे. तेजाला लग्न करून फसल्यासारखं वाटत होत. कारण तिची काळजी कोणालाच नव्हती तिच्या पैशावर सगळ्यांचं प्रेम होत.


एक दिवस विकासने गाडी घेईची म्हणून तेज्याच्या मागे तगदा लावला . तिच्या मागे चिडचिड करून शेवटी तिने कंटाळून त्याला एक लाख रक्कम दिली. हिच चुकी तेजाची झाली. कारण त्याने ओळखलं हिला मेंटली त्रास दिला कीं ही पैसे देणार. तिचं अवसान त्याने ओळखलं. सासूबाईंना तिने नवऱ्याबद्दल सांगितलं तो खूप त्रास देतो तर त्या सरळ म्हणाल्या तुमचा संसार आहे तुमचं तुम्ही बघा. मी काही त्यात पडणार नाही.


विकासकडे तेजासाठी प्रेम नव्हतेच. त्याचं प्रेम होत ते फक्त पैशावर. कधी कॉल करून तिला प्रेमाने विचारत नसे, कीं कधी घरात प्रेमाने बोलत असे. घरातील किराण्यापासून, दूध, भाजी, फळं आणण्यापासून तेजा करत. घरातील सगळं करून वेळेवर सर्वाना जेवायला देत.


सासूबाई तेवढं सांगत, " आज हा नाष्टा कर, तो नाष्टा कर, जेवायला ही भाजी बनव., तेजाला कधी उशिरहीझाला ऑफिसवरून येताना तर साधा कुकर, किंवा कोणत्याही घरातील कामाला हातभार लावत नसत. तीला तिची जागा एक घरातील मोलकर्णीचीच वाटे.


विकास घरी बारा वाजले तरी येत नसे, बाहेरच मित्रांबरोबर टाइमपास करत.रात्रीच्या बाराला त्याला जेवायला वाढून पुन्हा भांडी घासून दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील काम आवरून तिला बाहेर पडावे लागे. तिची धावपळ पाहून त्याला कधीच काही वाटत नसे.रोजची बस पकडून घरातील काम करून तिच्या नशिबी सुख मात्र कशाचेच नव्हते.ना नवऱ्याचे, ना सासूचे तिची अवस्था यंत्रवत झाली होती. कोणासाठी करतोय, कशासाठी करतोय तिला काहीच उपजत नव्हते. घरी बसलं तर पाच पैशाला महाग वरून घरात सुख कधी लाभणार नाही हे तिला चांगलच माहित होत.


तेजाची अवस्था तोंड दाबून बुक्यांचा मार अशीच झाली होती. इतकी विचित्र माणसं असतात तिला लग्न केल्यानंतर कळाले.तेव्हा मात्र वेळ निघून गेली होती. कोणाला सांगताही येत नव्हतं आणि सहनही होत नव्हतं. लाडात वाढलेली तेजा कोमजून गेली होती.


एक दिवस विकास घरी बारा वाजले तरी आला नाही तेजा तरीही काळजीने त्याला शोधायला गेली, रस्त्यावर ट्राफिक त्यात वाट दिसेल तिकडे ती जात होती. दोन, तीन मित्रांना त्याच्या कॉलही केला पण कोणालाही काही माहित नव्हतं. शेवटी विकासचाच कॉल आला. तिला त्याने एका ठिकाणी बोलावलं. ती तिकडे गेली तर तो रस्त्यावर पडला होता.त्याला कोणीतरी खूप मारहाण केली होती. कारण त्याने कोणाचे तरी पैसे उधार घेतलेले त्याला परत दिले नव्हते.


तेजाने त्याला हॉस्पिटल मध्ये नेले आणि त्याच्यावर उपचार सुरु झाले. तेजा तो कितीही वाईट असला तरी त्याची बायको म्हणून काळजी घेत होती. आज विकासाला स्वतःची लाज वाटत होती जिच्यासाठी एक रुपये खर्च केला नाही, कीं किंमत केली नाही.जिचा फक्त फायदा करून घेतला तिच स्त्री त्याला जपत होती.


"दवाखान्यात पुन्हा दोन माणसं आली. आज जिवंत सोडलंय पुन्हा नाही सोडणार. हे ऐकताच तिच्या मनात भीतीची कापरं भरली. आम्हाला आमचे पैसे पाहिजेत,


तेजा,"दादा किती रुपये घेतलेत यांनी...?


" दोन लाख रुपये कर्ज आहे याच्यावर..!


रक्कम ऐकूनच तिचे डोळे फिरले. तिने तिच्या जवळचे सगळे पैसे त्यांना दिले,आणि हात जोडून विनंती केली दादा यांना परत कधी पैसे देऊ नका. राहिलेले पैसे मी देते तुमचे सगळे तुम्ही काळजी करू नका .तुमच्या पाया पडते. तेजाने डोळ्यातले पाणी पुसले.


त्यातील एक जण तिच्याकडे पाहत म्हणाला, ताई तुमच्याकडे बघून सोडतो नाहीतर.......


विकासकडे बघत म्हणाला,बायकोची काळजी घे..! एवढी काळजी करणारी मिळाली. नाहीतर तुझी लायकी तरी आहे का..?"


असं म्हणून ती माणसं निघून गेली.


खरच होत विकासची लायकी नसताना एवढी चांगली शिकलेली बायको त्याला मिळाली होती.


विकासाला आज त्याची लाज वाटत होती. जे सोन्यासारख त्याच्याकडे होत ते त्याला जपता येत नव्हतं.


तेजाची त्याने माफी मागितली, आज त्याच्या डोळ्यात खरे अश्रू होते तेही तिच्यासाठी. तिला ते अश्रू पाहून खूप बरं वाटतं होत. आज खऱ्या अर्थाने तिच्या संसाराला नव्याने सुरुवात झाली होती.


आजच्या काळातही स्त्री जन्म कहाणी बदलेली नाही. तीच स्वरूप बद्दले आहे. अजूनही कोणत्याना कोणत्या मानसिक, शारीरिक त्रासातून स्त्रीला जावेच लागते.स्त्री कमवती असली तरी तिच्याकडून अपेक्षा मात्र अजूनच वाढल्या आहेत.


************समाप्त ************


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama