Swapna Sadhankar

Classics

3  

Swapna Sadhankar

Classics

घरटं

घरटं

1 min
138


उन्हाळ्याच्या सुट्ट्या आल्या की मी मुलीला घेऊन काही दिवस माहेरी राहायला जायची. माहेर घर हा एक वेगळा विषय आहे. मी दुसरी गोष्ट सांगणार आहे. एका उन्हाळ्यात असच घर बंद असताना बाल्कनीत कावळ्याने घरटं थाटलं. घरी परत आल्यावर बाल्कनीत जायची सोयच राहिली नाही. एकच बाल्कनी!, तर कपडे वाळत घालताना & काढताना एक लंबी काठी घेऊन कसे बसे मैनेज करत होतो. पण एक दिवस त्यालाही न जुमानता कावळा अंगावर धाऊन आला. म्हणून मग घरटं काढायला माणसांना बोलावले. त्यांनी सांगितलं त्यात ऑलरेडी दोन अंडी आहेत. ती फुटतील घरटं हलवलं तर. मग काय!, वाट पाहणं सुरू,.. कधी पिल्लं जन्माला येतील... कधी उडतील. कावळ्याचा पहारा देणं अविरत सुरू होतंच. आता सवय झाली होती बाल्कनीत जाताना काठी हातात ठेवायची. आम्ही त्या कावळ्याला घाबरायचो आणि तो आम्हाला. एक वेगळंच नातं तयार झालं होतं आमच्यात. आणि एक दिवस अचानक सगळं शांत झालं. कसं कधी कळलंच नाही. तो कावळा नंतर भटकलाच नाही. त्याचं ते घरटं साफ करताना आपसूक वेदना झाल्या... त्यानंतर काही वर्षांनी एका कबुतराच्या जोडीने तीच जागा फायनल केली त्यांच्या घरट्याकरिता. पण आम्ही ते बनू दिलं नाही. कारण नंतर जड मनाने ते साफ करण्यापेक्षा आधीच रोजच्या रोज साफ करत होतो. त्यांनी ते इतर सुरक्षित ठिकाणी बांधावं या उद्देशाने!



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics