हृदयी वसंत फुलताना भाग - एक
हृदयी वसंत फुलताना भाग - एक
पहील प्रेम हे पहील प्रेम असत.... त्याच्यापेक्षा सुंदर या जगात काहीच नरत.
पहिल प्रेम मिळो अथवा न मिळो पण सुंदर आठवणींची आयूष्यभर सोबत होते नाही का ? प्रेमात पडायला एक क्षण पुरेसा असतो... प्रेम कधी पहिल कींवा शेवटच नसत... कारण प्रेम हे केव्हाही होऊ शकत... प्रेम हे फक्त प्रेम असत...
म्हणतात ना.... " सच्चा प्यार चाहे दो पल के लिए ही हो.... मगर एहसास जिंदगी भर के लिए दे जाता हे ।
अशीच पहिल्या प्रेमाची त्याची आणि तिची कथा...
सकाळची वेळ होती... रस्त्यावर सगळीकठे ट्राफीक जाम... पलक आणि किमया दोघी एका स्कुटीवरून ऑफिसल्या निघाल्या... पण या ट्रॅफीकमुळे किमयाची चिडचीड होत होती. ति शिक्षिका होती एका शाळेत ती नेहमी वेळेतच निघायची... पण तिची मैत्रीण पलक नेहमीच ती त्याच रोडवर दुसर्या ऑफीसमध्ये जाॅबला होती... रोज दोघी
सोबत जायच्या. परंतु आज पलकमुळे किमयाला खुपच उशीर झालेला... ति तिला म्हणते.... " पलक, आज तुझ्यामुळे या ट्रॅफीकमध्ये वेळ जाऊ राहीला... वेळेत निघाली असतीस तर पण नाही ना... मॅडमला तोच ड्रेस आज हवा होता... नाही का ?" अर्थात पलकलाही उशील झाला होत होता पण ती दाखवत नव्हती. नाहीतर ही किमया परत मलाच लेक्चर देत बसेल.... मुलांना शिकवायच सोडून ही मलाच शिकवत
बसेन... पलल शांतच होती गाडीवर... पुढे काहीतरी प्रोब्लेम झाला होता म्हणून सगळेच बराचवेळ थांबुन होते.... हिला इतक बोलूनही ऐकायला येत नाही... म्हणून किमया टपली मारते पलकला.... " काय ग मॅडी... मी इतकी बोलत आहे तुला... आणि तु मस्त गाणे ऐकत आहेस..." ती ही हसते मग काय करू ? तु अजुन मला बोलशील आणि मला ऑलरेडी मला उशीर झालाय यार...."
किमया... - " हो का.... मॅडम चला आता... निघूया.... नाहीतर अजून उशीर होईल..." दोघीही आपल्या मार्गाने निघून जातात....
तुम्हांला समजल असेल स्टोरीची खरी हिरोईन कोण ? तरीही सांगते मी... किमया... शिक्षिका होती. लहान मुलांना
शिकवायची ती... मुलांची फेवरेट टिचर. किमया रंगाने गोरी, मुलायम आणि मोठे केस... तिला साजेशी हेऊर स्टाईल केलेली, तिचे कोळेभोर डोळे... पण खुप बोलके... उँच आणि अंगकाठी मध्यम... पण मनाने तितकीच सुंदर आणि गालावर तिच्या पडणारी खळी... सर्वांना समजुन घेणारी आणि सोबत घेऊन चालणारी, तिला साध राहणीमानच आवडायच... ट्रॅव्हलिंगची खुप आवड आणि पुस्तक वाचण... तिचा छंद... खुप बडबड करणारी... पण आवडणार्या व्यक्तींशी... आणी तितकीच हळवी होती... आईची आणि आजीची लाडकी... वडील ती लहान असतानाच वारले होते.... आईनेच जाॅब करून तिला शिकवल आणि मोठ केल होत... त्यामुळे आईच तिच सर्वस्व होत... अशी ही किमया रोज शाळेत शिकवायला जात होती... कधीच कुणाच्या प्रेमात पडली नव्हती... का तर तिला अजुन जसा पाहीजे
तसा मुलगा कुणी भेटला नव्हता... पण तिला खुप सारे मित्र - मैत्रिण होते...
किमया शाळेत जाते... मुलांमध्ये ती रमून जात असते... शाळेत गेल्यावर तिला थोड मोकळ्या वातावरणात छान वाटत... नाहीतर सकाळच्या ट्रॅफीकमुळे तिला कंटाळा आला होता... शाळा सुटली....तिने पलकला काॅल केला... पण मॅडमने फोनच नाही घेतला कामात असेल म्हणून किमया स्वतःच निघाली. ती शाळेतुन बाहेर आली. आज तिला थांबाव
लागणार होत... पलकसाठी... तिने थांबायला सांगीतल तिथे किमया जाऊन थांबली... चहा घ्यावा का पलीकडे जाऊन तर रस्त्याच्या त्या बाजुला तिला तो दिसला... एका कार मधुन उतरलेला... थ्री पीस सुट घातलेला एक तरूण उतरला... दिसायला एकदम हँडसम, Good looking... सेट केलेले हेअर, उँचेपुरा, जीमला जाऊन कमावलेली बाॅडी,
त्याची पर्सनॅलिटी, त्याची शरिरयष्टी बघुन कुणीही मुलगी सहज घायाळ होईल असा...
हाच कथेचा नायक... सावन देशमुख नाव त्याच... त्याची कारमधुन एंट्री झाली...
इकडे त्या बाजुवरून किमया त्याला बघत होती... त्याने handwast kel आणि तिथे
बसलेल्या एका वृध्दाला तो आपल्या हाताने त्या स्टाॅलवरून घेऊन काहीतरी खाऊ घालत होता... तो वृध्द व्यक्तिही आनंदाने त्याच्या हाताने खात होता. जणु हा त्याला रोजच भेटत असावा... ओळख असल्यासारख दोघे काही तरी बोलत होते... तिला आर्श्चय वाटल... की चांगला सूटाबुटाला तरूण अस वृध्दाला भरवतो आहे... कस शक्य आहे कदाचित प्रसिध्दीसाठी करत असावा... पण आजुबाजूला कुणी नव्हत आणि तो मनापासुन करत होता... तो गाडीत बसुन निघून गेला.... तरी किमया मॅडम त्याच्यातच हरवून गेली... " अरे यार हा तर आपल्या सारखाच आहे. कुणाच दुःख
आणि वेदना, कुणी उपाशी असलेल मला नाही आवडत... काही म्हणा पण याच्या या गोष्टीमुळे हा कोण आहे तो मला खुप भावला... नाहीतर एवढे लोक होते तिथे त्यालाच का तस वाटल... या सगळ्या विचारांत वेळ कधी होतो तिला कळत नाही. कीमया अजूनही त्या दिशेकडे बघत असते. नकळत तिच्या चेहर्यावर त्याच्यामुळे हास्य फुलत..
तेवढ्यात पलकची एंट्री होते... ति तिच्याकडे बघते... पण मॅडम त्यांच्याच धुंदीत हत्या... पलक तिच्यासमोर चुटकी वाजवते... " काय किमया मॅडम, कुठे हरवतात.... ये हॅलो... कुठे बघत आहेस तु... अग तिकडे उभा असणार्या मनुष्याच वय तरी बघ...."
कीमयाची तंद्री भंग पावते... " काय ग पलक, ती तिला जोरात मारते... माझ लक्ष नाही म्हणून काहीपण बोलतेस... " पलक - " मग सांग ना... कुणाकडे बघुन अशी स्माईल करत होतीस... "
कीमया... - " पलक अस काहीही झालेल नाही आणि मी कुणाकडे बघत नव्हते... तु मला सांग आज घरी जायच का इथेच मुक्काम करायचा.... "
पलक - " ठीक आहे.... मला वाटल की कुणी तुला भेटल की काय.... तुझ्यासारखाच.... " कीमया तिला परत मारते लाडाने आणि दोघीही हसतच घरी निघून जातात...
आज घरी गेल्यावर रात्री किमया त्याच मुलाचा विचार करत होती... त्याच ते रूप आणि ते घडलेल दृश्य तिला समोर दिसत होत... ती आज स्वतःशीच हसत होती... गाणे ऐकत कधी झोप लागली तिलाही कळल नाही....
दुसर्या दिवशी पलक किमयाची मैत्रिण लवकर तिच्या ऑफीसच्या कामाला निघून गेली... तर तोच काल बघीतलेला मुलगा काही मुलांशी भांडताना तिला दिसला... गर्दी खुप होती... पण तिने त्याला स्पष्ट पाहिल होत. नक्की काय चाललय किमयाला समजल नाही... पण त्या मुलाला पाहील्यावर तिला खुप वाईट वाटल.. ति तिथुन उशीर होईल म्हणुन निघाली....
नक्की काय झाल असेल तिथे, तो मुलगा असा कसा वागु शकतो... हाच विचार कीमया करत होती... जाऊदे आपण का त्याचा ईतका विचार करतोय... पण तिच्यासमोर त्याची ही दोन्ही रूप यायची... तिथे काय घडल असेल
हे पुढील भागातुन कळेल....
**********************************
हा पहिला भाग कसा वाटला वाचुन नक्की सांगा...